तुळशीबाग मंडळाने ढोलपथकाचा खर्च वाचवला:त्या निधीतून 6 विद्यार्थ्यांची फी भरून दिला सामाजिक संदेश
गणेशोत्सवातील पारंपरिक जल्लोषाला सामाजिक बांधिलकीची जोड देत श्री गजानन मंडळ ट्रस्ट, तुळशीबाग यांनी यंदाच्या उत्सवाची सुरुवात एका वेगळ्या संकल्पनेने केली आहे. ढोलपथक आणि इतर खर्च कमी करून त्या निधीतून नु.म.वि. प्रशालेतील ६ विद्यार्थ्यांचे वार्षिक शुल्क भरले. मंडळाने ‘उत्सवातून समाजासाठी काहीतरी’ देण्याचा संदेश दिला आहे. मंडळाचे अध्यक्ष सागर सुनील दहीभाते यांनी ही माहिती दिली. शालेय शुल्क…