Headlines

माझ्या सख्ख्या चुलत भावाचा मृत्यू डीजेमुळेच झाला:डीजेवर बंदी घालणे योग्यच, न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे- मेघना बोर्डीकर

सार्वजनिक सण-उत्सवांमध्ये न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून लावले जाणारे डीजे आणि लाऊडस्पीकर गरज पडल्यास बलप्रयोगाने बंद करावेत, या पुण्यातील विद्यानंद बापट यांच्या भूमिकेमुळे सध्या पुणे-मुंबईसह राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर या मुद्द्यावरून दोन गट पडले असून, एक गट डीजे आणि ढोल-ताशांच्या समर्थनार्थ, तर दुसरा गट ध्वनिप्रदूषणाचा दाखला देत डीजेबंदीच्या बाजूने उभा ठाकला आहे….

Read Full News

शहा म्हणाले- नक्सलवादानंतर अंमली पदार्थही संपवू:रेड कॉरिडॉरच्या विचारसरणीच्या लोकांनी शस्त्रे खाली ठेवली; ईशान्येत 10 हजार तरुणांचे आत्मसमर्पण

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी रविवारी गोव्यात सांगितले की, सरकारने नक्षलवाद संपवला आहे. आता अंमली पदार्थांच्या समस्येशीही त्याच पद्धतीने निपटले जाईल. ते म्हणाले की, “नक्षलवादानंतर अंमली पदार्थांच्या समस्येशीही त्याच पद्धतीने निपटले जाईल. ज्यांनी तिरुपती ते पशुपतिनाथपर्यंत रेड कॉरिडॉरची कल्पना केली होती, त्यांनी आता आपली शस्त्रे खाली ठेवली आहेत आणि ते मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत.”…

Read Full News

सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा ठप्प:महिनाभरातच उड्डाणांना 'ब्रेक', प्रवाशांचा अल्प प्रतिसाद आणि इंधन दरवाढीचा फटका

सोलापूर ते मुंबई ही बहुचर्चित विमानसेवा पुन्हा एकदा बंद झाली आहे. ‘स्टार एअर’ या कंपनीने गेल्या महिन्यात, 2 ऑगस्ट 2026 रोजी ही सेवा नव्याने सुरू केली होती. त्याआधी 28 जून 2026 रोजी ही उड्डाणे सुरू करण्यात आली होती. मात्र, आता अवघ्या महिनाभरातच ही सेवा पुन्हा स्थगित करण्यात आल्याचे कंपनीने प्रशासनाला कळवले आहे. त्यामुळे विमानसेवा पुन्हा…

Read Full News

‘डीजे बंदीमुळे काहींना वाईट वाटत असेल तर वाटू द्या’:संजय शिरसाटांची ठाम भूमिका, ‘लोकांचा जीव महत्त्वाचा की आनंद?’

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या वापरावरून राज्यात चर्चा सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी डीजे बंदीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “डीजे बंदी झाली पाहिजे, हेच आमचे स्पष्ट मत आहे. डीजे बंदीमुळे काही लोकांना वाईट वाटत असेल तर वाटू द्या; मात्र लोकांचा जीव महत्त्वाचा आहे की आनंद?”, असा सवाल शिरसाट यांनी केला. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने…

Read Full News

13 वर्षांपासून फरार कुख्यात शिकारी शेरू पारधी अटकेत:कर्नाटकातील वाघ शिकार प्रकरणात मध्य प्रदेशातून पत्नीसह पकडला

महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये वाघांच्या शिकारीचे मोठे जाळे चालवणारा कुख्यात शिकारी शेरू पारधी अखेर मध्य प्रदेश ‘टायगर स्ट्राइक फोर्स’च्या हाती लागला आहे. त्याला मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवरून त्याची पत्नी बिनौरी हिच्यासह पकडण्यात आले. शेरू पारधी उर्फ शेरू छेलाल धुर्वे याच्यावर २००२ मध्ये कर्नाटकात वाघाच्या शिकारीचा गुन्हा दाखल आहे. तसेच, २०१३…

Read Full News

मुंबईत ‘स्पेशल 26’च्या धर्तीवर बनावट आयकर छापा:व्यावसायिक दाम्पत्याचे अपहरण, 1 कोटींची खंडणी मागितली

आयकर विभाग आणि गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून एका व्यावसायिकाचे आणि त्याच्या पत्नीचे अपहरण करून कंपनीवर बनावट छापा टाकल्याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी मुंबई आणि पुण्यातून सहा जणांना अटक केली आहे. या टोळीने कारवाई टाळण्यासाठी व्यावसायिकाकडे तब्बल 1 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. हा प्रकार 17 जुलै रोजी अंधेरी पूर्वेतील चाकाळा परिसरातील सहार कार्गो इस्टेटमधील ‘टू…

Read Full News

उत्साहाच्या भरात कायदा विसरू नका; गणेश मंडळांना पोलिसांचे आवाहन:राहुरी तालुक्यातील वांबोरीत मंडळांची पोलिस प्रशासनाने घेतली बैठक‎

गणेश मंडळांनी गणेशोत्सव आनंदात साजरा करतानाच समाजोपयोगी उपक्रमही राबवावेत. उत्सवातील आवांतर खर्चाला फाटा देऊन गरजू मुलींसाठी सायकल वाटपासारखे उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहन राहुरीचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी केले. उत्सव साजरा करताना तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे; उत्साहाच्या भरात कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेतल्यास उत्सवाला एक वेगळी शिस्त व प्रतिष्ठा लाभेल, असेही त्यांनी…

Read Full News

शिक्षकांच्या शैक्षणिक संशोधनासाठी जिल्हा परिषद निधी देणार- मंत्री विखे:शिक्षणातील गुंतवणूक वाढवून अहिल्यानगरला प्रथम क्रमांकावर नेणार‎

प्राथमिक शिक्षणात गुंतवणूक वाढवून अहिल्यानगर जिल्ह्याचे शैक्षणिक क्षेत्र अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षकांना शैक्षणिक संशोधनासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या वतीने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त प्राथमिक शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात झालेल्या…

Read Full News

जर्मनीतील आयटी इंजिनिअरची पुण्यात आत्महत्या:मायदेशी परतताच टोकाचे पाऊल

जर्मनीमध्ये एका नामांकित कंपनीत उच्च पदस्थ आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेला तरुण आठ दिवसांपूर्वीच मायदेशी परतला होता. मात्र, कौटुंबिक वादातून निर्माण झालेल्या मानसिक तणावात त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे घडली. अमोल सुखराज गाढवे असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमोल गाढवे हे गेल्या काही वर्षांपासून…

Read Full News

ISRO Privatization Controversy | Employee Unions Demand Explanation

40 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक इस्रोच्या नऊ कर्मचारी संघटनांनी अंतराळ संस्थेचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांना पत्र लिहून खाजगीकरणावर स्पष्टीकरण मागितले आहे. हे पत्र 4 सप्टेंबर रोजी लिहिले होते. ही माहिती आज समोर आली आहे. कर्मचारी संघटनांनी म्हटले आहे की, सरकारी संस्थांमध्ये खाजगी कंपन्यांचा सहभाग असू शकतो, परंतु इस्रो एक मजबूत संस्था म्हणून कायम राहिली पाहिजे. तिला…

Read Full News