हिंजवडीच्या पायाभूत सुविधांसाठी आयटी कर्मचारी रस्त्यावर:इन्फोसिस सर्कलपासून मोर्चा, आदित्य ठाकरेही सहभागी
हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज, 6 सप्टेंबर रोजी आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढला. हिंजवडीतील इन्फोसिस सर्कल, फेज-1 परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. या आंदोलनात आयटी कर्मचाऱ्यांबरोबरच स्थानिक रहिवासी, विविध सामाजिक संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते…