शिक्षकदिन साजरा:विद्यार्थ्यांनी सांभाळला कारभार, 50 विद्यार्थ्यांनी स्वीकारली शिक्षकांची जबाबदारी
राजेश्वर युनियन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षकदिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित ‘स्वयंशासित शाळा’ उपक्रमात ५० विद्यार्थ्यांनी शिक्षक-शिक्षिकांसह विविध पदांची जबाबदारी स्वीकारत एक दिवस शाळेची धुरा सांभाळली. संपदा खरतडे यांनी प्राचार्य, संचुका चोरे यांनी उपप्राचार्य, तर अंशुमन भडके, चैतन्य कैकाडे व शौर्य धर्माळे यांनी शारीरिक शिक्षकाची भूमिका बजावली….