Headlines

हिंगोली पोलिसांची मोठी कारवाई:जुगार अड्ड्यावर छापा टाकून 18.47 लाखांचा मुद्देमाल जप्त, हिंगोली शहर पोलिस ठाण्यात, 18 जणांवर गुन्हा दाखल

हिंगोली शहरात एनटीसी भागात विशेष पोलिस उपमहानिरीक्षक व शहर पोलिसांच्या पथकाने जुगार अडयावर छापा टाकून 18.47 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये एका चारचाकी वाहनाचा समावेश आहे. या प्रकरणी 18 जणांवर रविवारी ता. 6 हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड परिक्षेत्रातील हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाची…

Read Full News

न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती:देशभरातील 8 उच्च न्यायालयांत नव्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची पदोन्नतीवर कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी, तर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. .केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी एक्सवरून या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने शिफारस केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच देशभरातील…

Read Full News

यवतमाळ हादरले:मानलेल्या बहिणीशी बोलल्याच्या रागातून मित्राचाच खून, दोन्ही अल्पवयीन मारेकरी पोलिसांच्या ताब्यात‎

मानलेल्या बहिणीशी मोबाईलवर संवाद साधत असल्याच्या रागातून दोन अल्पवयीन मित्रांनीच एका 18 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री पिंपळगाव परिसरातील बोबडे ले-आऊटमध्ये घडली. रोहित वीरेंद्र मेश्राम (वय 18, रा. बोबडे ले-आऊट, यवतमाळ) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी लोहारा पोलिसांनी दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. दिलेल्या…

Read Full News

सन्मानाच्या दिवशीच शिक्षकांचा ठिय्या:जुनी पेन्शन न मिळाल्यास 28 सप्टेंबरपासून मुंबईत ठिय्या आंदोलन‎

जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ राज्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षक दिनी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला. काळ्या फिती लावून जोरदार घोषणाबाजी करत, शासनाचा निषेध केला. जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव तथा जुन्या पेन्शन योजना समन्वय संघाचे राज्य समन्वयक महेंद्र हिंगे, राज्य समन्वयक सुनील भोर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले….

Read Full News

तत्परतेमुळे देवदूत ठरली आशा सेविका:पाच महिन्यांच्या बाळाचे वजन अवघे 3 किलो 200 ग्रॅम; वेळेत उपचार‎

तालुक्यातील वनोजा बाग येथे पाच महिन्यांच्या बालकाचे वजन अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आशा सेविकेने दाखवलेल्या तत्परतेमुळे बालकाला वेळीच पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. अवघे ३ किलो २०० ग्रॅम वजन असलेल्या या बालकाची प्रकृती लक्षात घेऊन बालकाच्या आईला आवश्यक आरोग्यविषयक समुपदेशन करण्यात आले. बालकाला अधिक चांगल्या वैद्यकीय तपासणी व उपचारांची आवश्यकता असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला…

Read Full News

नदी स्वच्छ करणाऱ्या बिट्टूला नेदरलँड्सची जॉब ऑफर:डच सीईओ म्हणाले- आमच्यासोबत काम करा; इंग्लिश क्रिकेटपटूनेही केले कौतुक

एकट्याने नदी स्वच्छ करणाऱ्या मध्य प्रदेशातील २० वर्षीय सुरेंद्र सिंह चौधरी ‘बिट्टू तबाही’ यांना नेदरलँड्सच्या ‘द ओशन क्लीनअप’ संस्थेने नोकरीची ऑफर दिली आहे. संस्थेचे संस्थापक आणि CEO बॉयन स्लैट यांनी बिट्टूच्या मेहनतीने प्रभावित होऊन लिहिले – आमच्यासोबत काम करा. ‘द ओशन क्लीनअप’ कंपनी समुद्र आणि नद्यांमधून प्लास्टिक कचरा काढण्याचे काम करते. इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू केविन…

Read Full News

चोरीचे शेतीसाहित्य खरेदी करणारे ‘त्रिकूट’ गजाआड:पोलिसांनी जप्त केला 5.72 लाखांचा मुद्देमाल‎

अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून शेतातील साहित्य, इलेक्ट्रिक मोटर पंप आणि केबल चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. या चोऱ्यांमुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अंजनगाव सुर्जी पोलिसांनी शेती साहित्य आणि केबल चोरी करणाऱ्या टोळीचा माग काढला. यावेळी पोलिसांनी चोरीचा माल चोरट्यांकडून खरेदी करणाऱ्या तीन आरोपींना पकडले आहे. मात्र मुख्य…

Read Full News

राज्यस्तरीय तपासणीसाठी 12 ‎ग्रामपंचायतींत होणार निवड‎:पाच वर्षांत तब्बल 22 हजार वृक्षांची लागवड अन् डिजिटल शिक्षण

संत गाडगेबाबांनी कृतीतून स्वच्छतेचा, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामविकासाचा संदेश दिला. या संतांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देत तालुक्यातील पार्डी ग्रामपंचायतीने ग्रामविकासाचा आदर्श निर्माण केला आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल २२ हजार वृक्षांची लागवड, डिजिटल शिक्षण, सौरऊर्जा, शुद्ध पिण्याचे पाणी, सार्वजनिक वाचनालय, क्रीडांगण, व्यायामशाळा यांसह विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याने पार्डीची २८ हजार ग्रामपंचायतींतून…

Read Full News

शिक्षण आयुक्त कार्यालयावर आंदोलन:संच मान्यतेच्या अन्यायकारक निकषाला विरोध, महासंघ व विज्युक्टाचा सहभाग‎

ऑनलाइन संचमान्यतेच्या अन्यायकारक निकषांविरुद्ध राज्यातील अनेक शिक्षकांनी महासंघ व विज्युक्टाच्या नेतृत्वात महामोर्चा काढून शिक्षण आयुक्त कार्यालयाला घेराव घातला. या आंदोलनात अमरावतीच्या शिक्षकांनीही सक्रिय सहभाग घेतला. संचमान्यतेचे घातक निकष लादून हजारो शिक्षकांचा कार्यभार संपविण्याचा हा डाव असल्याचा आरोप डॉ. अविनाश बोर्डे यांनी मोर्चाला संबोधित करताना केला. शुक्रवारी पुणे येथे महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, कार्याध्यक्ष डॉ….

Read Full News

दिल्लीत युवकाची मारहाण करून हत्या:आरोपींनी काठी – रॉडने केला हल्ला; वाचवण्यासाठी आलेल्या गार्डलाही दिली धमकी

दिल्लीच्या पूर्व दिल्लीतील मयूर विहार फेज-3 मध्ये एका व्यक्तीची लाठी आणि रॉडने मारहाण करून हत्या करण्यात आली. ही घटना पहाटे 5 वाजता घडल्याचे सांगितले जात आहे. हा परिसर न्यू अशोक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हत्येमागील कारण आणि आरोपींबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली…

Read Full News