भारतीय बुद्धिबळपटूंनी सलग तिसऱ्यांदा गॅपरिंदाश्विली करंडक जिंकला:उझबेकिस्तानमधील ऑलिम्पियाडमध्ये रौप्य, कांस्य पदके मिळवत वर्चस्व सिद्ध केले
उझबेकिस्तान मधील समरकंद येथे नुकत्याच पार पडलेल्या 46व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत खुल्या गटात रौप्य पदक, महिला गटात कांस्य पदक पटकावताना भारतीय बुद्धिबळपटूंनी सलग तिसऱ्यांदा गॅपरिंदाश्विली करंडकावर मोहर उमटविली आणि जागतिक बुद्धिबळावर आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. चेन्नई येथे 2022मध्ये आणि बुधापेस्ट 2024 मध्ये झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड नंतर भारतीयांची सर्वसाधारण विजेतेपदाची ही हॅटट्रिक ठरली. खुल्या…