Headlines

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत मोठा दावा:‘तीन महिन्यांची मुदत नाही, सरकारने दिला एक वर्षाचा वेळ’

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. अंतरवाली सराटी येथे सुरू केलेले उपोषण तब्बल २० दिवसांनंतर पाटोदा येथे सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर स्थगित करण्यात आले. यानंतर जरांगे पाटील यांनी सरकारला मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिल्याचे जाहीर केले. मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा मुंबईच्या दिशेने आंदोलन नेण्याचा…

Read More

बाबा म्हणाला- 22 एकर सरकारी जमीन बळकावू:बुंदेलखंडातील बनावट साधू, बागेश्वरप्रमाणे दरबार भरवत आहेत; ना मंत्र येतो, ना चालीसा

शास्त्र आणि मंत्रांच्या माहितीवर प्रश्न विचारले असता उत्तर देता आले नाही, मात्र चमत्कारांचे दावे केले. दैनिक भास्करच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये एका बाबाने स्वतःला देव म्हटले, तर दुसऱ्याने घरात आपले पोस्टर लावल्यास तिथूनच सर्व काही पाहत असल्याचा दावा केला. बुंदेलखंडात पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या लोकप्रियतेदरम्यान चमत्कारांचा दावा करणारे अनेक बाबा समोर आले आहेत. यापैकी काही जण…

Read More

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मित्राला अटक!:हल्ला होताना आणि हॉस्पिटलमध्ये नेतानाही होता सोबत, पप्या शिंदे पोलिसांच्या ताब्यात

शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्यातील विभाग प्रमुख प्रदीप पु्र्णेकर यांची मंगळवारी रात्री त्यांच्या कार्यालयातच निर्घृण हत्या करण्यात आली. मानपाडा परिसरातील मनोरमानगर येथील ऑफिसमध्ये घुसून हल्लेखोरांनी पूर्णेकरांवर सहा ते सात राऊंड फायरिंग केले. त्यांचा जीव गेलाय याची खात्री करण्यासाठी त्यांच्यावर कोयत्यानेही वार करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ठाण्यात आणि राजकीय वर्तुळात…

Read More

स्वस्त तिकिटे शोधेल, हॉटेलची खोलीही बुक करेल डॉट्स:ओपनएआयने नवीन AI एजंट लॉन्च केला; सध्या सशुल्क वापरकर्त्यांना मिळेल

विमानाची स्वस्त तिकिटे शोधायची असो किंवा आवडत्या हॉटेलमध्ये खोली आरक्षित करायची असो, आता यासाठी तुम्हाला तासन्‌तास स्क्रीनसमोर डोके खपवण्याची गरज भासणार नाही. चॅटजीपीटी बनवणाऱ्या ओपनएआय कंपनीने ‘डॉट्स’ हे नवीन टूल लॉन्च केले आहे. हे सर्व काही आपोआप करून देईल. ओपनएआयने हे टूल नुकत्याच लॉन्च झालेल्या मेटाच्या ‘म्यूज’ला टक्कर देण्यासाठी आणले आहे. हे टूल सामान्य चॅटबॉटप्रमाणे…

Read More

SC म्हणाले- फटाक्यांवर पूर्णपणे बंदी नाही:मात्र 24 तास फटाके फोडण्याची परवानगीही नाही, सरकारने वेळ निश्चित करावी

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फटाक्यांवरील बंदी उठवण्याच्या याचिकेवर सुनावणी केली. यावेळी न्यायालयाने म्हटले की, संपूर्ण देशात फटाक्यांवर बंदी घालणे शक्य नाही. पूर्ण बंदीमुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातील. मात्र, २४ तास आतषबाजीला परवानगीही देता येणार नाही. फटाके फोडण्यासाठी वेळ निश्चित करावा लागेल, जेणेकरून सणही साजरा करता येईल आणि लोकांना त्रासही होणार नाही. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरैश आणि…

Read More

राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या:अन्यथा मंत्र्यांना गावात फिरू देणार नाही, रवीकांत तुपकर यांचा इशारा

राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत पुढील आठ दिवसांत त्यांच्या बँक खात्यात जमा करावी अन्यथा राज्यातील सर्वच मंत्र्यांना गावात फिरू देणार नाही असा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवीकांत तुपकर यांनी बुधवारी ता. ३० हिंगोली येथे दिला आहे. हिंगोली येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी मोर्चा काढण्यात आला. छत्रपती…

Read More

सांगली जिल्हा बँक निवडणूक:गोपीचंद पडळकरांच्या शक्तिप्रदर्शनात जयंत पाटलांविरोधात जोरदार घोषणाबाजी

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून सांगली जिल्ह्यातही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या पाठोपाठ आता आमदार गोपीचंद पडळकर आणि नेते सदाभाऊ खोत यांनीही या निवडणुकीत उतरून रणशिंग फुंकले आहे. आमदार गोपीचंद पडळकर…

Read More

Jitendra Awhad Demands Ballot Paper Elections At INDIA Alliance Meeting

“देशातील लोकशाही व्यवस्था पद्धतशीरपणे उद्ध्वस्त करण्याचा विडा सध्याच्या राज्यकर्त्यांनी उचलला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगातील एकाधिकारशाही आणि मतदार यादीतील फेरफार हा अत्यंत गंभीर विषय बनला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे केवळ पुढे केलेले प . केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वादग्रस्त भूमिकेवरून आणि ‘एसआयआर’ (SIR) मोहिमेवरून नवी दिल्लीत राष्ट्रीय पातळीवर ‘इंडिया’ (INDIA) आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक…

Read More

विदर्भात सरासरीपेक्षा 27 टक्के कमी पाऊस:11 पैकी 8 जिल्ह्यांची स्थिती चिंताजनक, आगामी काळात जलसंकटाची शक्यता

विदर्भ विभागात या पावसाळ्यात सरासरीपेक्षा 27 टक्के कमी पाऊस झाला आहे. यामुळे आगामी काळात मोठे जलसंकट आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, अपेक्षित 937.3 मिमीच्या तुलनेत केवळ 687.3 मिमी पावसाची नोंद झाली. विभागातील 11 पैकी आठ जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट 20 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक 43% कमी पाऊस झाला….

Read More

महाराष्ट्र शासनाचा माजी अग्निवीरांना शासकीय सेवेत १० टक्के आरक्षण:अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेने निर्णयाचे स्वागत केले; महाराष्ट्रातील रहिवाशांना लाभ

महाराष्ट्र शासनाने माजी अग्निवीरांना राज्यातील गट-क गणवेशधारी शासकीय सेवांमध्ये १० टक्के समांतर आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २९ सप्टेंबरला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद, महाराष्ट्र व गोवा शाखेने स्वागत केले आहे. या धोरणाचा लाभ महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या माजी अग्निवीरांना मिळणार असून, पोलीस,…

Read More