240 शिक्षकांना पाच परकीय भाषांचे ऑनलाइन प्रशिक्षण:पुणे जिल्हा परिषद अन् सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उपक्रम
पुणे जिल्हा परिषद आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या परकीय भाषा शिक्षण उपक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला सुरुवात झाली आहे.जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना परकीय भाषांचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील विविध भाषा व संस्कृतींची ओळख करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागामार्फत 21…