पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक:हजारो पात्र शिक्षक अन् प्राध्यापक नोंदणीपासून वंचित राहिल्याचा प्रा. सचिन सानपांचा आरोप
आगामी शिक्षक आणि पदवीधर विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी प्रक्रियेतील कथित विसंगतींवर शिक्षक उमेदवार प्रा. सचिन सानप यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील हजारो पात्र शिक्षक आणि प्राध्यापक नोंदणीपासून वंचित राहिल्याचा आरोप त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सानप यांच्या म्हणण्यानुसार, शिक्षक मतदार…