महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात आणि प्रलंबित मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन पुकारले आहे. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिला असून, राज्य सरकार आणि
.
‘पदाला गोचिडासारखे चिकटलेत’
रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट करत विद्यार्थ्यांच्या व्यथा आणि आयोगाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आणला. ते म्हणाले, “MPSC च्या अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत असताना नैतिकतेला धरून त्यांनी या महत्त्वाच्या पदाचा त्याग करणे अपेक्षित होते. मात्र, जर ते या पदाला गोचिडासारखे चिकटून बसणार असतील, तर त्यांना हटवण्याचा पर्याय सरकारकडे आहे. सरकारने याबाबतची प्रक्रिया तातडीने सुरू करावी.”
‘विद्यार्थ्यांना आंदोलनाची हौस नाही’
मुख्यमंत्र्यांसोबत आज विद्यार्थ्यांची बैठक होणार असून, त्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना काही ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. “अभ्यास सोडून रस्त्यावर आंदोलन करण्याची हौस कोणत्याही विद्यार्थ्याला नाही. मात्र, आज भ्रष्ट अध्यक्षांमुळे भविष्यात अंधकार दिसत असल्याने विद्यार्थ्यांकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना ठोस आश्वासन द्यावे,” असे पवार म्हणाले.
‘व्ही. राधा समितीच्या नावाखाली वेळ मारून नेऊ नका’
राज्य सरकारने स्थापन केलेल्या व्ही. राधा समितीचा संदर्भ देत पवार यांनी सरकारला थेट इशारा दिला. “व्ही. राधा समिती शिफारशी देईल तेव्हा निर्णय घेऊ, अशी कोरडी आश्वासने देऊन वेळ मारून नेऊ नका. मुख्यमंत्र्यांनी तातडीने या भ्रष्ट अध्यक्षांना हटवून विद्यार्थ्यांना विश्वासात घ्यावे आणि एखाद्या स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची या पदावर नेमणूक करावी,” अशी मागणी त्यांनी केली.

—————————–
हेही वाचा..
ठाण्यात ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या: पूर्णेकर कुटुंबीयांचे माजी महापौरांवर गंभीर आरोप, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर

ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मानपाडा परिसरातील क्लस्टर डेव्हलपमेंट आणि राजकीय वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत असून, पूर्णेकर कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर या हत्येचे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सविस्तर वाचा