Headlines

7 वर्षांपासून रखडलेल्या भरतीसाठी कोल्हापुरात आंदोलन:उपकेंद्र सहाय्यक भरती तात्काळ काढण्याची मागणी, शिकाऊ उमेदवारांच्या प्रश्नांवरूनही विद्यार्थ्यांचा संताप

महावितरणच्या उपकेंद्र सहाय्यक पदाची नवीन सरळसेवा भरती मागील सात वर्षांपासून झालेली नसल्याने या पदाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज कोल्हापूर येथील महावितरण झोन कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी उपकेंद्र सहाय्यक पदाची भरती तात्काळ जाहीर करावी, तसेच महावितरणमध्ये Apprenticeship (शिकाऊ उमेदवारी) पूर्ण केलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत न्याय्य संधी द्यावी, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. महावितरणमध्ये उपकेंद्र सहाय्यक पदासाठी…

Read More

'बुलढाणा बिहार, तर चिखलीला तुम्ही गाझियाबाद करून ठेवलाय!':आमदार संजय गायकवाडांचा श्वेता महालेंवर घणाघात

बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि भाजप आमदार श्वेता महाले यांच्यातील राजकीय लढाई आणि आरोप-प्रत्यारोपांची पातळी दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, शिवसैनिक महिलांना माझ्या घरातून मेसेज जात असल्याचा पुरावा जर त्यांनी मला दिला, तर मग माझ्या स्वभावाप्रमाणे मी काय करायचे ते करेल….

Read More

सेनगावच्या शासकीय गोदामात निकृष्ट धान्याचा साठा:दोषींवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन करू, ठाकरे गटाचा इशारा

सेनगाव येथील शासकीय गोदामात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी ता. 30 भेट देऊन पाहणी केली. यामध्ये गव्हात किडे तर तांदूळाची चुरी झालेली आढळून आली. या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी दिला आहे. सेनगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानामार्फत लाभार्थ्यांना धान्य वाटप केले जाते. त्यासाठी शासकीय गोदामात धान्य…

Read More

'त्या' मफलरवाल्याचा पर्दाफाश 10 तारखेला करणार!:रोहित पवारांचा सरकारला थेट इशारा- पुढच्या कॅबिनेटमध्ये हेक्टरी 1 लाख न दिल्यास समृद्धी महामार्ग रोखणार

“राज्यातील शेतकरी आणि शेतमजूर 1972 पेक्षाही भीषण अशा दुष्काळाच्या खाईत लोटला गेला आहे. केंद्राच्या ‘इस्रो’च्या (ISRO) संकेतस्थळावर कोणत्या तालुक्यात पावसाची तूट आहे हे स्पष्ट दिसत असताना, हे सरकार मात्र गाढ झोपले होते. सत्ताधारी आमदारांनी गोंधळ घातल्यानंतर घाईगडबडीत 40 तालुक्यांची दुसरी यादी जाहीर केली. मात्र, केवळ कागदोपत्री दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; पुढच्या कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांना…

Read More

कुटुंबाने 4 वर्षे मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवला:50 लाख खर्च केले, भावनिक ओढीपोटी अंत्यसंस्कार केला नाही; मुंबईतील घटना

मुंबईतील मालाडमध्ये 80 वर्षांच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 4 वर्षे उलटूनही त्यांच्या पत्नीने आणि दोन मुलांनी भावनिक जिव्हाळ्यामुळे अंत्यसंस्कार केले नाहीत. कुटुंबाने मृतदेह फ्रीजरमध्ये सुरक्षित ठेवला असून, त्यासाठी 50 लाख रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. पोलिसांनी कोणत्याही गैरप्रकाराची शक्यता नाकारली आहे. या व्यक्तीचा 2022 मध्ये कर्करोग, मूत्रपिंड निकामी होणे आणि वयाशी संबंधित इतर आजारांमुळे मृत्यू झाला…

Read More

नोएल टाटा यांच्याविरोधातील तक्रार धर्मादाय आयुक्तांपर्यंत पोहोचली:वेणू श्रीनिवासन यांनी चेअरमनपदावर प्रश्न उपस्थित केले

टाटा समूहातील नेतृत्व आणि प्रशासनावरून वाद वाढला आहे. टाटा ट्रस्ट्सचे संयुक्त नामनिर्देशित संचालक वेणू श्रीनिवासन यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, नोएल टाटा अध्यक्षपदी कायम असताना समूहाची प्रमुख कार्यकारी होल्डिंग कंपनी ‘टाटा सन्स’च्या कामकाजात कसे सहभागी होऊ शकतात. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, श्रीनिवासन यांनी महाराष्ट्राच्या धर्मादाय आयुक्तांना पत्र लिहून नोएल यांना कायमस्वरूपी विश्वस्त आणि अध्यक्षपदी ठेवण्यास…

Read More

Gunratna Sadavarte Slams Thackeray Brothers Over Mumbai Morcha Controversy

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष सघन पुनरीक्षण (SIR) मोहिमेवरून आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधूंनी पुकारलेल्या 4 ऑक्टोबरच्या महामोर्चावर प्रसिद्ध वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. “र . तसेच, 4 ऑक्टोबर रोजी भायखळा ते मुंबई महानगरपालिका मुख्यालयादरम्यान निघणाऱ्या या मोर्चाला परवानगी मिळू नये आणि पोलिसांनी परवानगी दिल्यास गुन्हे…

Read More

किल्लारी भूकंपाला 33 वर्षे पूर्ण!:30 सप्टेंबरची ती 'काळरात्र' महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, अमित देशमुखांनी व्यक्त केल्या भावना

30 सप्टेंबर 1993 ची ती भयंकर पहाट महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. गणपती विसर्जनानंतरच्या त्या रात्री संपूर्ण महाराष्ट्र साखरझोपेत असताना, लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि आजूबाजूची गावे अचानक आलेल्या विनाशकारी भूकंपाने हादरून गेली, ज्यामध्ये हजारो निष्पाप लोक झोपेतच ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या घटनेच्या आठवणी अजूनही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. कुटुंबच्या कुटुंब रात्रीतून उद्ध्वस्त झाले. आज या…

Read More

Gold Silver Price Today | India Bullion Market Rate Update 2026

नवी दिल्ली19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये आज सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर तेजी आली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 712 रुपयांनी वाढून 1,48,379 रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी 29 सप्टेंबर रोजी तो 1,47,667 रुपयांवर होता. त्याचवेळी, एक किलो चांदीचा भाव 673 रुपयांनी वाढून 2,22,273 रुपयांवर पोहोचला आहे,…

Read More

पुणे-सोलापूर रस्त्यावर टँकरच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू:दुचाकीस्वार मित्र जखमी, लोणी काळभोर भागात टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोर भागात घडली. या प्रकरणी टँकर चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अपघातात दुचाकीस्वार तरुण जखमी झाला. अनयकुमार उदयकुमार चौधरी असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार अनय मंगेश कामदेव (वय २१, रा. तोरडोस हाईट्स, शेवाळवाडी, पुणे-सोलापूर रस्ता) जखमी झाला. याबाबत अनय…

Read More