Headlines

लोकसहभागातून दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यस्तरीय कार्यशाळा:जलव्यवस्थापनासह अन्नसुरक्षा, चारा नियोजनावर भर

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकसहभागातून शाश्वत उपाययोजना राबविणे, नैसर्गिक संसाधनांचे प्रभावी व्यवस्थापन करणे आणि स्थानिक गरजांनुसार दुष्काळ निवारणाचा कृती आराखडा तयार करणे, या उद्देशाने स्वयम् शिक्षण प्रयोग (SSP) संस्था आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाशी संबंधित परभणी कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ‘लोकसहभागातून दुष्काळावर मात…

Read Full News

6 राज्यांमध्ये राज्यपाल बदलले, यात एका महिलेचा समावेश:मध्य प्रदेशचे ढालसिंह उत्तराखंडचे, ओम माथूर केरळमचे राज्यपाल झाले

राष्ट्रपतींनी सोमवारी ६ राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. ओम प्रकाश माथुर यांची केरळमच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे तमिळनाडूचे राज्यपाल असतील. डॉ. सुधा यादव यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर बृज मोहन राम ओडिशाचे, डॉ. ढालसिंह बिसेन उत्तराखंडचे आणि दुष्यंत गौतम सिक्कीमचे…

Read Full News

जळगावमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे ‘छोटा हत्ती’ वाहन पलटी:8 ते 10 विद्यार्थी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवासात सोमवारी मोठी दुर्घटना घडली. जळगावजवळील उमाळा फाट्याच्या परिसरात शाळकरी मुलांना घेऊन जाणारे ‘छोटा हत्ती’ वाहन अचानक पलटी झाले. या अपघातात 8 ते 10 विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यापैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अपघातानंतर जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात…

Read Full News

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नांदगाव खंडेश्वर तहसीलवर मोर्चा:दुष्काळी अनुदान, कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी किसान सभा, शेतमजूर युनियन सहभागी

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) आज नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यात महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि शेतमजूर संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. कॉम्रेड तुकाराम भस्मे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख दुष्काळी अनुदान, संपूर्ण…

Read Full News

कर्करोगाच्या औषधांवर 30% पेक्षा जास्त नफ्यावर बंदी:सुप्रीम कोर्टाने विचारले- इतर औषधांच्या किमतींवर नियंत्रण का नाही, 27 ऑक्टोबरपर्यंत उत्तर मागवले

सर्वोच्च न्यायालयाने कर्करोगाच्या औषधांवरील नफा ३०% पर्यंत मर्यादित करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. न्यायालयाने म्हटले की, सरकारच्या उत्तरात आनंद मानण्यासारखे काहीही नाही. न्यायालयाने विचारले की, कर्करोगाच्या औषधांवर मार्जिन निश्चित केले जाऊ शकते, तर इतर औषधांच्या किमतींवर नियंत्रण का नाही? केंद्राने सांगितले की, कर्करोगाच्या औषधांवरील नफ्याची मर्यादा निश्चित केल्यामुळे रुग्णांची दरवर्षी सुमारे २,५०० कोटी रुपयांची…

Read Full News

अमरावती-यवतमाळ महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले:समृद्धी महामार्गाशी जोडणाऱ्या रस्त्यासाठी नागरिकांचे गडकरींना साकडे, आंदोलनाची तयारी

अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक १४ च्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. समृद्धी महामार्गाशी थेट जोडणी असलेल्या या रस्त्यासाठी आता जिल्ह्यातील नागरिक पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले आहे. हा महामार्ग महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर असून, उत्तर व दक्षिण कॉरिडॉरला जोडतो. गडकरींनी या कामाला यापूर्वीच मान्यता दिली होती,…

Read Full News

प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापकांचा सहसंचालक कार्यालयाला घेराव:अमरावतीत दोन तास ठिय्या आंदोलन, शासनाला निवेदन सादर

अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने अमरावतीत उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाला घेराव घातला. प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी हे आंदोलन झाले. आंदोलनकर्त्यांनी दोन तास ठिय्या आंदोलन केले. सहसंचालक डॉ. अभय खांबोरकर यांना शासनाच्या नावाने निवेदन देण्यात आले. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील प्राध्यापक यात सहभागी होते. शिक्षक पदांचे संरक्षण, तातडीची पदभरती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कार्यभार…

Read Full News

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 58 वा पुण्यतिथी महोत्सव 24 ऑक्टोबरपासून:गुरुकुंज आश्रमात; 30 ऑक्टोबरला ऐतिहासिक मौन श्रद्धांजली

क्रांतीदर्शी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५८ वा पुण्यतिथी महोत्सव २४ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे आयोजित केला आहे. या आठ दिवसीय महोत्सवात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम होतील. यात ३० ऑक्टोबर रोजी होणारी ऐतिहासिक मौन श्रद्धांजली हा मुख्य कार्यक्रम असेल. अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाने या महोत्सवाचे नियोजन केले आहे. त्यासाठी अनेक समित्याही…

Read Full News

शिक्षक मतदारसंघासाठी 35810 मतदारांची यादी जाहीर:विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केली घोषणा; 23 ऑक्टोबरला मतदान

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील मतदारांची बहुप्रतिक्षित यादी १२ ऑक्टोबर रोजी जाहीर झाली. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी ही घोषणा केली. यानुसार, ३५ हजार ८१० मतदार शिक्षक आमदार निवडतील. हे मतदार ८१ मतदान केंद्रांवरुन मतदान करतील. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक १० हजार ९७ मतदार आहेत. बुलढाणा जिल्ह्यात ९ हजार १२४, यवतमाळमध्ये ६ हजार ९३२, अकोल्यात ५ हजार…

Read Full News

मोर्शीत शेतकऱ्याच्या गाडीच्या डिक्कीतून 2 लाख चोरी:बँकेतून काढलेले पैसे परतफेड करण्यासाठी जात असताना घटना, सीसीटीव्हीमध्ये 3 चोरटे कैद

मोर्शी येथे एका शेतकऱ्याच्या गाडीच्या डिक्कीतून २ लाख रुपये चोरीला गेल्याची घटना घडली. सोमवारी सकाळी ११.४५ वाजता पुनर्वसन कॉलनी परिसरात ही चोरी झाली. भाईपूर येथील सारंग पुरुषोत्तम खरापकर या शेतकऱ्याने पेरणीसाठी घेतलेले उसनवारीचे पैसे परत करण्यासाठी हे २ लाख रुपये बँकेतून काढले होते. त्यांचे वडील पुरुषोत्तम यांनी मोर्शी येथील भारतीय स्टेट बँकेतून पैसे काढले आणि…

Read Full News