Headlines

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:मंत्री देसाई, चव्हाणांसह 8 नेत्यांच्या 10 कारखान्यांकडे एफआरपी बाकी; शेतकऱ्यांना 14 दिवसांत उसाचे पैसे देण्याचा नियम धाब्यावर

शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी घेऊनही त्याची रास्त व किफायतशीर किंमत (एफआरपी) राज्यातील २५ साखर कारखान्यांकडे अद्याप बाकी आहे. विशेष म्हणजे, या २५ कारखान्यांपैकी १० कारखाने राजकीय लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित आहेत. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांना एफआरपी वेळेत देण्याचा नियम असताना दुसरीकडे राजकीय संबंध असलेल्या कारखान्यांकडेच एफआरपी थकबाकी असल्याचे चित्र आहे. दरम्यान, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते…

Read Full News

राज्यात आणखी 18 तालुक्यांत प्रत्यक्ष पाहणीनंतर दुष्काळ जाहीर केला जाणार:मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय, पाणी-चाऱ्यासह इतर बाबींत सवलती मिळतील

एल निनोच्या प्रभावामुळे यंदा महाराष्ट्रात १९ टक्के पाऊस कमी झाला म्हणून सरकारने २६५ तालुक्यांमध्ये सप्टेंबर अखेर दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुष्काळी भागांतील उपाययोजनांसाठी स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक २९ सप्टेंबर रोजी झाली होती. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीतील चर्चेनंतर आणखी १८ तालुक्यांत प्रत्यक्ष पाहणीनंतर दुष्काळ जाहीर केला जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी…

Read Full News

संभाजीनगरसह राज्यातील 23 शहरांचा पारा 35 अंश सेल्सियसपेक्षा अधिक:अति तीव्र एल निनोमुळे स्थिती

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या माघारीनंतर राज्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा तीव्र झाला असून शुक्रवारी (९ आॅक्टोबर) राज्यातील २३ प्रमुख शहरांमध्ये कमाल तापमान ३५ अंश सेल्सियस किंवा त्याहून अधिक नोंदवले गेले आहे. हवामान विभागानुसार विदर्भातील अमरावती येथे सर्वाधिक ३९.४ अंश सेल्सियस या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे, तर मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे राज्यातील सर्वात कमी २८.२ अंश सेल्सियस…

Read Full News

दोन वर्षे उलटली, वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ कागदावरच!:मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतरही अंमलबजावणीचा पत्ता नाही; साताऱ्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचे आंदोलन

पहाटेच्या अंधारापासून शहराच्या कानाकोपऱ्यात वृत्तपत्रे पोहोचविणाऱ्या विक्रेत्यांच्या कल्याणाचा प्रश्न मात्र अद्याप अंधारातच आहे. वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेचा निर्णय होऊन जवळपास दोन वर्षे उलटली, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. शासनाच्या या दिरंगाईचा निषेध करत शुक्रवारी साताऱ्यात वृत्तपत्र विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.महामंडळाच्या अंमलबजावणीसाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली. महाराष्ट्र राज्य…

Read Full News

खासदारकीपेक्षा जनसेवा मोठी:सहकारात राजकारण घुसल्यास सामान्यांचे नुकसान, उदयनराजे भोसलेंचा स्पष्ट इशारा

सत्ता आणि पदांपेक्षा जनतेशी असलेली बांधिलकी महत्त्वाची आहे सातारा जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या भाषणातून हाच संदेश दिला. ‘मी पदासाठी हपापलेलो नाही. खासदारकीचा राजीनामाही दिला होता. त्यापेक्षा जिल्हा बँकेचे पद मोठे नाही. या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा करता येते, हीच माझी भूमिका आहे,’ असे सांगत त्यांनी पदाच्या राजकारणापेक्षा जनहिताला प्राधान्य…

Read Full News

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक:संतोष कनोजिया उर्फ टल्लीसह हेल्मेटधारी आरोपी पोलिसांच्या ताब्यात

ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली याला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-5 आणि खंडणीविरोधी पथकाने प्रयागराज येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्यासोबत एका अज्ञात हेल्मेटधारी आरोपीला देखील पोलिसांनी पकडले आहे. ठाणे क्राइम ब्रँचने ही कारवाई केली. प्रदीप पूर्णेकर हत्या…

Read Full News

जयपूरला पोहोचले साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि गुरु रंधावा:ब्लॅक मास्क घालून विमानतळावरून बाहेर पडले, कडक सुरक्षा व्यवस्था होती; सौरभ शुक्लाही दिसले

जयपूरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी फिल्म स्टार्सची लगबग पाहायला मिळाली. साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि पंजाबी गायक गुरु रंधावा जयपूरला पोहोचले. दोन्ही स्टार्स काळे मास्क घालून आणि कडेकोट सुरक्षेत विमानतळाबाहेर आले. यावेळी अभिनेता सौरभ शुक्लाही दिसले. त्यांच्या उपस्थितीने विमानतळावरील लोकांचे लक्ष वेधून घेतले. सुरक्षेसाठी बाहेरील राज्यातून बाउन्सर्स बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बाउन्सर्सनी विमानतळावर उपस्थित…

Read Full News

SIR वरून देवेंद्र फडणवीस-काँग्रेसमध्ये जुंपली:‘बेकायदेशीर मुख्यमंत्री’ फडणवीसजी, उगाच वडाची साल पिंपळाला लावू नका; कॉंग्रेसचा पलटवार

मतदार याद्यांमधील कथित घोळ, मतदार पुनर्पडताळणीची ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रिया आणि केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीने दिल्लीतील संसदेपासून रस्त्यांपर्यंत रान उठवले असतानाच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कपिल सिब्बल यांचा थेट संसदेतील ऐतिहासिक व्हिडिओ शेअर करत काँग्रेसवर कॉंग्रेसची डबल ढोलकी म्हणत हल्लाबोल केला होता. यावर आता कॉंग्रेसने देखील जोरदार प्रत्युत्तर…

Read Full News

'आमच्याशिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही':युगेंद्र पवारांचा दावा; सोमेश्वर साखर कारखान्यात तिरंगी लढत

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’ निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची जर इच्छाच नसेल तर आपण काय करू शकतो. या कारखान्यात तिरंगी लढत होत आहे….

Read Full News

‘शिवसेना सोडण्याचा इरादा नाही’:गजानन कीर्तिकरांनी चर्चांना लावला पूर्णविराम; म्हणाले- ‘पक्षाला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार’

राज्याच्या राजकीय वर्तुळात शिंदेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच, माजी खासदार गजानन कीर्तिकर हे नाराज असून पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, गजानन कीर्तिकर यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत माध्यमांतील वृत्त निराधार आणि खोटे असल्याचे सांगितले. तसेच, यापुढे शिवसेना पक्षाला राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार असल्याचेही…

Read Full News