Headlines

नांदूरशिंगोटेत रविवारपासून कीर्तन महोत्सवाचे आयोजन:नवरात्रोत्सवात नामवंत महिला कीर्तनकारांची सेवा‎

येथील श्री रेणुकामाता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त रविवार (दि. ११) पासून दहा दिवस कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत महिला कीर्तनकारांची कीर्तने ऐकण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून, मंदिरासह संकुलातील कलशांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रेणुकामाता मंदिराच्या पटांगणात कीर्तन महोत्सवासाठी व्यासपीठ उभारण्यात आले आहे. मंदिर…

Read Full News

नवरात्राेत्सव:घाटणदेवी मंदिर पहाटे 4 ते रात्री 12 पर्यंत राहणार खुले

घाटणदेवी मातेच्या दर्शनासाठी यंदा सुमारे चार लाख भाविक येण्याचा अंदाज असून, भाविकांच्या सुरक्षिततेसह त्यांना सुलभ आणि सुखकर दर्शन मिळावे, यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मंदिर पहाटे ४ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत खुले ठेवण्यात येणार आहे. गर्दीचे नियोजन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्राथमिक आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहन तसेच ज्येष्ठ नागरिक…

Read Full News

कारच्या धडकेमध्ये जखमी मध्य प्रदेशच्या तरुणाचा मृत्यू:डोंगरगाव फाट्याजवळ अज्ञात भरधाव कारची धडक‎

डोंगरगाव फाट्याजवळ अज्ञात कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या १९ वर्षीय तरुणाचा बुधवारी रात्री १०.२० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. युवराज बस्तीराम इवने (वय १९, रा. भडूस, ता. जि. बैतूल, मध्य प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. युवराज सिल्लोड येथील एका जिनिंगमध्ये मजुरीचे…

Read Full News

पाचोड येथील हॉटेलवर धुडगूस घालत पेट्रोल ओतून जाळण्याचा केला प्रयत्न:15 जणांवर गुन्हा दाखल; ग्रामस्थांचा ठाण्यामध्ये 3 तास ठिय्या‎

धुळे-सोलापूर महामार्गावरील एका हॉटेलवर ७ ऑक्टोबर रोजी तरुणांच्या टोळक्याने हॉटेलमध्ये शिरून वेटर विशाल गायकवाड व व्यवस्थापक रोहित नरवडे (२१) यांच्यासह कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच साहित्याची तोडफोड करत किचनमध्ये पेट्रोल टाकून हॉटेल जाळण्याचा प्रयत्न केला. रोहित नरवडे यांच्या तक्रारीवरून कुणाल म्हस्के, शाहरूख शेख उर्फ गाठ, अजय म्हस्के, नागेश आहीरे, आदेश उर्फ लल्या नेमाणे,…

Read Full News

आढावा बैठक:पाणीटंचाईकडे दुर्लक्ष नको; रोहयोची कामे तातडीने सुरू करा: आमदार भुमरे

तालुक्यात यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, नागरिकांना वेळेत पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या; तसेच रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करून दुष्काळाच्या काळात मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून द्या, असे स्पष्ट निर्देश…

Read Full News

गायरान जमिनींवरील हक्क मान्य करून अतिक्रमणधारकांना तात्काळ न्याय द्यावा:पैठण तहसील कार्यालयावर गायरानधारकांचा भाकर आक्रोश मोर्चा‎

न्याय द्या, न्याय द्या, सरकार आम्हाला न्याय द्या अशा घोषणा देत भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी पैठण तहसील कार्यालयावर धडक भाकर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. गायरान जमिनींवरील हक्क मान्य करून अतिक्रमणधारकांना तात्काळ न्याय द्यावा, अशी प्रमुख मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली. या आंदोलनाची सुरुवात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून…

Read Full News

अभियान:वडीगोद्रीत 27 कुमारिकांना एचपीव्ही लस;‎ आतापर्यंत 41 मुलींचे यशस्वी लसीकरण‎

महिलांच्या आरोग्याची सुरक्षा आणि भविष्यातील कर्करोगमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अभियान सध्या वरदान ठरत आहे. याच अभियानांतर्गत वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत १४ वर्षे पूर्ण झालेल्या २७ कुमारिका मुलींना गर्भाशयमुखाच्या कर्करोगाविरुद्ध (सर्व्हायकल कॅन्सर) प्रतिबंधक एचपीव्ही लस यशस्वीरीत्या देण्यात आली. यापूर्वी झालेल्या मोहिमेतील १६ मुलींसह आतापर्यंत एकूण ४१ पात्र मुलींचे लसीकरण पूर्ण झाले…

Read Full News

कर्जमाफीची घोषणा; बँकांकडून कर्ज मिळेना:शासनाकडून घोषणा होऊन दोन महिने उलटले, अंमलबजावणी कागदावरच

राज्य शासनाने मोठ्या घोषणाबाजीत जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाला दोन महिन्यांहून अधिक कालावधी लोटला आहे. मात्र, इतका वेळ उलटूनही या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप कागदावरच अडकल्याने बळीराजा पूर्णपणे निराश झाला आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि लालफितीच्या कारभारामुळे शेतकरी पुन्हा एकदा कर्जबाजारीपणाच्या चक्रात ढकलला जात असून, शेतकरी वर्गातून शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शासनाने काही महिन्यांपूर्वी…

Read Full News

गाढेजळगाव शिवारामध्ये कपाशीत गांजाची लागवड:करमाड पोलिस; 18 लाखांचा मुद्देमाल जप्त‎

गाढेजळगाव शिवारात शेतात बेकायदेशीरपणे गांजाची लागवड केल्याचा प्रकार समोर आला आहे. करमाड पोलिसांनी शुक्रवारी सकाळी शेतात छापा टाकून ७२.७८ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली. जप्त केलेल्या या गांजाची बाजारभावाप्रमाणे किंमत १८ लाख १९ हजार ५०० रुपये आहे. याप्रकरणी शेतकरी श्रीराम रघुनाथ कोरडे (५०, रा. गाढेजळगाव) याला अटक करण्यात आली आहे. गाढेजळगाव शिवारातील शेतात गांजाची…

Read Full News

मानसिक आरोग्य दिन‎:तणावमुक्त जीवनासाठी दररोज 5 मिनिटे बोला, बदलत्या जीवनशैलीने 18 ते 35 वयोगटात मानसिक ताण वाढला‎

धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येकाच्या‎आयुष्यात मानसिक ताण वाढताना दिसत‎‎आहे. मात्र, प्रत्येकाच्या‎‎या ताणामागील कारणे‎‎वेगवेगळी आहेत.‎‎विद्यार्थ्यांना भविष्याची‎‎चिंता, गृहिणींना‎‎घरातील वाढत्या‎‎जबाबदाऱ्या, तर‎‎शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या‎चिंतेचा सामना करावा लागत आहे. मानसिक‎ताणाच्या तक्रारी घेऊन येणाऱ्यांमध्ये १८ ते ३५‎वयोगटातील रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असून,‎दररोज विश्वासू व्यक्तीशी ५ मिनिटे संवाद‎साधावा, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशिष‎मोहिते यांनी स्पष्ट केले.‎ आज जागतिक मानसिक आरोग्य दिन‎असून त्याअनुषंगाने डाॅ. मोहिते यांनी मानसिक‎आरोग्य सुदृढ…

Read Full News