Headlines

गणेशपूरच्या मंदिरातील चोरीचा छडा; 2 आरोपी जेरबंद, मुद्देमाल हस्तगत:पिशोर पोलिसांनी तांत्रिक तपासाआधारे चोरट्यांना शिर्डी येथून केली अटक‎

कन्नड तालुक्यातील गणेशपूर येथील जागृत गणपती मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेचा पिशोर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे छडा लावला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, मंदिरातून चोरीस गेलेला चांदीचा मुकुट आणि चांदीचा मोदक असा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. गणेशपूर येथील गणपती मंदिरात २९ सप्टेंबर रोजी रात्री ११ ते ३० सप्टेंबर…

Read Full News

शेकटा मंडळात केंद्रीय पथकाकडून दुष्काळी पिकांची 30 मिनिटे पाहणी:शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा: पथक पाहणीचा अहवाल केंद्र शासनास देणार‎

यंदा दुष्काळी परिस्थिती गंभीर असून पाण्याअभावी सोयाबीन, तूर, कपाशी करपून गेली आहे. फळबागा, पाणी व चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने शुक्रवारी शेकटा मंडळातील देमणी वाहेगाव शिवारातील गट क्र. ८३ मध्ये सोयाबीनची ३० मिनिटे पाहणी केली. शेतकरी विकास शिंदे यांनी सोयाबीनसाठी एकरी ३० ते ३५ हजार रुपये खर्च करूनही पीक जळाले असल्याचे…

Read Full News

रिधोरा येथील रेणुकामाता मंदिरात नवरात्रोत्सवात हजारो भाविक येणार:दर्शनरांगा, भाविकांसाठी पाणी, आरोग्यसेवेचे नियोजन

फुलंब्री-राजूर रस्त्यावर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या रिधोरा येथील प्रसिद्ध रेणुकामाता मंदिरात येत्या ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. उत्सवाच्या नऊ दिवसांत राज्यभरातून, विशेषतः छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांतील हजारो भाविकांची आणि महिलांची मोठी गर्दी होणार आहे. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन येणाऱ्या भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी आणि सुरक्षेसाठी ग्रामस्थांच्या वतीने सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात…

Read Full News

इंद्रगढी देवी संस्थानची नवरात्रोत्सव तयारी पूर्ण:रविवारी घटस्थापना; विविध कार्यक्रमांचे आयोजन‎

येथून जवळच डोंगराच्या रम्य कुशीत वसलेल्या आणि माहूरच्या श्री रेणुका मातेचे प्रमुख उपपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगदंबा श्री इंद्रगढी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची संस्थानात जय्यत तयारी झाली आहे. आगामी नवरात्रोत्सवासाठी संस्थान पूर्णपणे सज्ज झाले असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष रघुनाथ मोरे आणि उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे यांनी दिली असून, २० हजार भाविक दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त…

Read Full News

सोशल मीडियात विवाहितेचे बनावट अकाउंट तयार करून अश्लील पोस्ट:पती अन् भावालाही मेसेज; जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

विवाहितेचे फोटो वापरून समाज माध्यमावर बनावट अकाउंट तयार करत अत्यंत अश्लील व आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून बदनामी केली. एवढेच नाही तर पीडितेच्या पतीसह नातेवाइकांनाही विकृत मेसेज पाठवून मानसिक छळ केला. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून जवाहरनगर ठाण्यात गुन्हा नोंदवला असून सायबर सेलच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू आहे. गादिया विहार परिसरातील ३० वर्षांच्या विवाहितेच्या पतीला ४ ऑक्टोबर रोजी…

Read Full News

संभाजीनगरमध्ये मराठा-राजभोग हॉटेलवर एफडीएची कारवाई:अस्वच्छतेमुळे परवाने निलंबित, स्वयंपाकघरात झुरळे; शाकाहारी, मांसाहारी पदार्थ एकत्र ठेवले

अन्न व औषधी प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने बजाजनगर येथील हॉटेल मराठा आणि वडगाव कोल्हाटी (महाराणा प्रताप चौक) येथील राजभोग हॉटेल या दोन आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित केल्याची माहिती सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली आहे. हॉटेल मराठाला ९८ पैकी ३३; तर राजभोग हॉटेलला ८८ पैकी अवघे १८ गुण मिळाल्याने ते एफडीएच्या तपासणीत अनुत्तीर्ण ठरले आहे. सहायक आयुक्त…

Read Full News

जागतिक मानसिक आरोग्य दिन:संभाजीगर शहराची डिप्रेशन लेव्हल 7 टक्क्यांनी वाढली; दर महिन्याला 15000 रुग्णांवर उपचार

बदलती जीवनशैली, करिअरची जीवघेणी स्पर्धा आणि मनातील विचार जवळच्यांशी न बोलता आतल्या आत दाबून ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे शहरातील नैराश्याच्या पातळीचे प्रमाण ७ टक्क्यांनी वाढले आहे. ३० वर्षांपूर्वी हे प्रमाण नगण्य होते. सद्य:स्थितीत दर महिन्याला किमान १५ हजार जणांना उपचार घ्यावे लागत आहेत. गेल्या तीन दशकांतील स्थिती पाहता शहरात मानसोपचारतज्ज्ञांची संख्या अवघ्या २ वरून ६० पेक्षा जास्त…

Read Full News

मिरवणूक:हिराकाका प्रांगणात 3 तास भक्तामर स्तोत्र; 1 हजार भक्तांनी केले 48 कडव्यांचे पठण

विश्व भक्तामर दिनानिमित्त भक्ती आणि आध्यात्मिकतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. सकल जैन समाजातर्फे नवाबपुरा येथील हिराकाका प्रांगणात सामूहिक भक्तामर स्तोत्र पठण झाले. यात १ हजार भाविकांनी सहभाग घेतला. पहिल्यांदाच विनम्रसागर महाराजांच्या सान्निध्यात ४८ कडव्यांच्या भक्तामर स्तोत्राचे सामूहिक पठण केले. राजाबाजार खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत, पार्श्वनाथ मंदिर तसेच चातुर्मास संयोजन समितीतर्फे कार्यक्रम झाला. सकाळी राजाबाजार येथील…

Read Full News

CJP चे आज जंतरमंतरवर आंदोलन:पोलिसांची परवानगी नाही; दिल्लीला येणाऱ्या 250 ट्रेन रद्द, 45 मेट्रो स्टेशन बंद, 38 हजारांचा फौजफाटा तैनात

कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) आज दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. सीजीपीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि SIR रद्द करण्याची मागणी केली आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला अद्याप परवानगी दिली नाही. CJP ने ७ ऑक्टोबर रोजी आंदोलनाची माहिती दिली होती, तर नियमानुसार १० दिवस आधी अर्ज करणे आवश्यक असते. आंदोलनाच्या…

Read Full News

संभाजीनगरात विकलेला प्लॉट पुन्हा विकला; चौघांवर गुन्हा:दुसऱ्याला प्लॉट विकून 10 लाखांची फसवणूक

विक्री केलेला आणि ताब्यात असलेला प्लॉट २०२१ मध्ये मुलाच्या नावे नोंदणीकृत खरेदीखत करून दिल्यानंतर त्याच प्लॉटची २०२३ मध्ये दुसऱ्याच्या नावे पुन्हा नोंदणी करुन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १८ ऑगस्ट २०२१ ते १७ जानेवारी २०२३ दरम्यान घडला. तुळसाबाई पांडुरंग प्रधान (तक्षशिलानगर, मोंढा), विजय कीर्तिकर (संसारनगर, क्रांती चौक), गणेश परदेशी ( छावणी) आणि राजू पांडुरंग प्रधान…

Read Full News