Headlines

जिओच्या IPO चा प्राइस बँड ₹1,065-1,119 असू शकतो:₹30,200 कोटी उभारण्याची योजना, ₹10.3 लाख कोटी बाजारमूल्यांकनाचे लक्ष्य

रिलायन्स इंडस्ट्रीजची टेलिकॉम आणि डिजिटल सेवा कंपनी ‘जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड’ देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO आणण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी या इनिशियल पब्लिक ऑफरिंगमध्ये आपल्या शेअर्सचा प्राइस बँड ₹1,065 ते ₹1,119 प्रति शेअर निश्चित करू शकते. रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी ₹10.3 लाख कोटींपर्यंतचे मार्केट व्हॅल्यूएशनचे लक्ष्य ठेवून पुढे जात आहे. 30,200 कोटी…

Read Full News

एमआयटी डब्ल्यूपीयूत मिटसॉगच्या 22 व्या बॅचचा दीक्षारंभ:खासदार डॉ. राधा मोहनदास अग्रवाल म्हणाले, लोकशाहीत चांगल्या नेतृत्वासाठी व्यावहारिक शिक्षण गरजेचे

“व्यावहारिक शिक्षण पद्धती आवश्यक असून त्यामधूनच लोकशाहीत चांगले नेतृत्व उदयास येते. राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्नांबरोबरच जबाबदाऱ्या पेलण्यासाठी तत्पर असावे. मिटसॉगच्या विद्यार्थ्यांनी व्यावहारिक शिक्षणाबरोबरच स्थानिक निवडणुकीत उमेदवारी घेऊन निवडणूक लढवावी,” असा सल्ला राज्यसभा खासदार डॉ. राधा मोहनदास अग्रवाल यांनी दिला. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या वतीने आयोजित मास्टर्स इन पॉलिटिकल लीडरशिप…

Read Full News

‘मतदारांची नावे गेली कुठे?’:आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR प्रक्रियेतील आकडेवारीवर उपस्थित केले प्रश्न

देशात निवडणूक आयोगाच्या कारभारावरून विरोधकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एसआयआर प्रक्रियेत घोळ करून निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाला मदत करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडून केला जात आहे. या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांकडून केली जात आहे. या मुद्द्यावरून गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत राजकीय वातावरण…

Read Full News

एमपीएससीसह 14 आयोगांतील रिक्त पदांचा प्रश्न उच्च न्यायालयात:4 लाख उमेदवारांवर परिणाम, पदे भरण्याचे निर्देश देण्याची मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह (एमपीएससी) राज्यातील 14 वैधानिक आणि घटनात्मक संस्थांमधील रिक्त पदांचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते विवेकानंद पाटील यांनी ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली असून, संबंधित संस्थांमधील रिक्त पदे निश्चित कालमर्यादेत भरण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्याची मागणी केली आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 226 अंतर्गत दाखल केलेल्या या…

Read Full News

पुण्यातील महालक्ष्मी मंदिरात सामूहिक श्रीसूक्त पठण सोहळा:सारसबाग मंदिरात 12 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजता, महापौर मंजुषा नागपुरे प्रमुख पाहुण्या

श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती या आदिशक्तीच्या त्रिदेवी स्वरूपाचे पवित्र अधिष्ठान असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग, पुणे येथे सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२६ निमित्त सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजता भव्य सामूहिक श्रीसूक्त पठण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वात श्री महालक्ष्मी देवीची आराधना, भक्तिभाव आणि आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती देणाऱ्या…

Read Full News

NDRF जवानांसाठी ‘प्रोजेक्ट निर्मल’ सुरू:कुटुंबीयांनाही मिळणार 24 तास मानसिक आरोग्य सेवा; तणाव आणि सामाजिक कलंक दूर करण्यावर भर

आपत्तीच्या काळात जीव धोक्यात घालून बचावकार्य करणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आरोग्यविषयक मदत मिळावी, यासाठी ‘प्रोजेक्ट निर्मल’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. एनडीआरएफ वाइव्ह्स वेल्फेअर असोसिएशन (एनडब्ल्यूडब्ल्यूए) आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या ‘एम्पॉवर’ या मानसिक आरोग्य सेवा संस्थेमध्ये याबाबत सामंजस्य करार झाला आहे. देशभरातील जवानांसाठी समुपदेशन, मानसिक आरोग्य…

Read Full News

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी:‘पेपरफूटवेळी ते अध्यक्षपदी नव्हते, मग राजीनामा कसा घेणार? CM देवेंद्र फडणवीसांचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालघर येथे ‘सेवा संकल्प अभियान 2026’ या उपक्रमांतर्गत नागरिकांना विविध शासकीय सेवा योजनांच्या लाभांचे वितरण करण्यात आले. दरम्यान, एमपीएससीमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Read Full News

ज्येष्ठ नाटककार सई परांजपेंना विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर:बालनाट्य, नाट्यलेखन आणि दिग्दर्शनातील योगदानाचा गौरव

ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनानिमित्त नाट्य संमेलनाचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गौरव पदक, 30 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर…

Read Full News

नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्री दत्ता म्हणाली:#MeToo आंदोलनानंतर आयुष्य नरक बनले, अभिनेत्रीच्या वक्तव्यावर AICWA ने व्यक्त केली नाराजी

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ताने शुक्रवारी सांगितले की, #MeToo आंदोलनानंतर तिचे आयुष्य नरक बनले. नाना पाटेकर यांचे गुरुवारी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दत्ताने 2008 मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. पाटेकर यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. दत्ताने ऑक्टोबर 2018 मध्ये पुन्हा हे आरोप केले…

Read Full News

JNUने प्राध्यापक-काँग्रेस खासदार बिमोल अकोइजाम यांना बडतर्फ केले:11 विद्यार्थिनींच्या लैंगिक छळासाठी दोषी ठरले; मणिपूर हिंसाचारादरम्यान राजकारणात आले होते

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (JNU) प्राध्यापक आणि इनर मणिपूरचे काँग्रेस लोकसभा खासदार डॉ. अंगोमचा बिमोल अकोइजाम यांना बडतर्फ केले आहे. विद्यापीठाने त्यांना 11 विद्यार्थिनींच्या लैंगिक छळासाठी दोषी ठरवले. बडतर्फीचा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत समितीने (IC) केलेल्या चौकशीच्या निष्कर्षांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. ICने बिमोल अकोइजाम यांच्याविरुद्ध कठोर शिक्षा करण्याची शिफारस…

Read Full News