Headlines

वाचन संस्कृती घराघरांत पोहोचविणे काळाची गरज:उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणेंचे प्रतिपादन; समूह वाचन व ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुस्तके माणसाच्या विचारांना प्रगल्भ करतात. डिजिटल युगात भावी पिढीच्या बौद्धिक विकासासाठी वाचन संस्कृती चळवळीच्या स्वरूपात घराघरांत पोहोचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे यांनी शुक्रवारी येथे केले. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली आणि स्थानिक वाचन कट्टा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल कॉलनी येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी…

Read Full News

कोनने पुण्यात पहिले डिजिटल अनुभव केंद्र सुरू केले:कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाने स्मार्ट इमारतींचा अनुभव मिळेल

लिफ्ट आणि एस्केलेटर क्षेत्रातील जागतिक कंपनी कोन ने भारतातील पहिले डिजिटल अनुभव केंद्र पुण्यात सुरू केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डेटा, इंटरनेट जोडणी आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून इमारती अधिक स्मार्ट, कार्यक्षम आणि परस्परांशी जोडलेल्या कशा बनवता येतात, याचा प्रत्यक्ष अनुभव ग्राहकांना घेता येणार आहे. या केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी (९ ऑक्टोबर) कोनचे…

Read Full News

विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणुकीचे चित्र स्पष्ट:उमेदवारी अर्ज माघारीनंतर राजकीय समीकरणे बदलली; कुठे कोणात रंगणार लढत?

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार असून, यामध्ये पुणे शिक्षक, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर या मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान, या पाचही मतदारसंघांसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे उमेदवारांच्या माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. आता पाहुयात कोणत्या मतदारसंघात कोणाला संधी देण्यात आली आहे. छत्रपती…

Read Full News

10 तारखेनंतर देशात गृहयुद्ध भडकवण्याचा कट?:50 हजार दंगलखोरांना दिल्लीत एंट्री, तर आंदोलकांची नाकेबंदी; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

“देशभरात सुरू असलेल्या तीव्र असंतोषाला दडपण्यासाठी केंद्र सरकारकडून हिटलरशाही पद्धतीचा अवलंब सुरू आहे. 10 तारखेच्या आंदोलनात दंगल घडवून आणण्यासाठी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित 50 हजारांहून अधिक दंगलखोर फौजेला दिल्लीत खुलेआम प्रवेश दिला गेला असून, शांततेने आंदोलन करणाऱ्यांना मात्र दिल्लीच्या वेशीवरच अडवले जात आहे. जर या दडपशाहीतून लाठीमार आणि गोळीबाराचे वातावरण निर्माण झाले,…

Read Full News

अमरावतीत महायुतीला दिलासा!:तीन बंडखोरांची माघार; अमरावती शिक्षक मतदारसंघात 26 उमेदवार रिंगणात

राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. राज्यातील पाचपैकी दोन जागा शिक्षक मतदारसंघातील, तर तीन जागा पदवीधर मतदारसंघातील आहेत. पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांतील उमेदवारीचे अंतिम चित्र आज स्पष्ट झाले. पुण्यात महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी…

Read Full News

हिंगोली जिल्ह्यात पदवीधर मतदारांची संख्या 6 हजाराने घटली:नोंदणीच्या प्रचार प्रसारात प्रशासन अपयशी, यावर्षी 10 हजार मतदार करणार मतदान

हिंगोली जिल्ह्यात पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मागीलवेळच्या तुलनेत यावेळी मतदारांची संख्या ६ हजाराने घटली असून यावर्षी १० हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार नोंदणीसाठी प्रचार प्रसारामध्ये निवडणुक प्रशासन अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच मतदार नोंदणीची संख्या घटल्याची चर्चा सुरु झाली आहे. छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणुक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीत…

Read Full News

अभिजीत दिपकेंवर भडकले मनोज मुंतशिर:म्हणाले- हे तरुणांच्या बळावर देशाला पुढचा नेपाळ, पाकिस्तान किंवा बांगलादेश बनवू इच्छितात

राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार मनोज मुंतशिर यांनी मतचोरीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणांवरून एक व्हिडिओ जारी केला. यामध्ये त्यांनी अभिजीत दिपके यांच्यावर तरुणांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आणि यूट्यूबर ध्रुव राठी यांच्यावरही टीका केली. मनोज मुंतशिर यांनी आपल्या जवळपास ८ मिनिटे ४२ सेकंदांच्या व्हिडिओची सुरुवात तरुणांना संबोधित करत केली. त्यांनी म्हटले की, तरुण तथ्य समजून न…

Read Full News

अजय देवगणच्या कारकिर्दीतील दुसरा मोठा हिट ठरला दृश्यम-3:'गोलमाल अगेन'ला मागे टाकले; भारतात 245 कोटी रुपये कमावले

अभिषेक पाठक यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘दृश्यम 3’ हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई करत अभिनेता अजय देवगणच्या कारकिर्दीतील दुसरा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या 7 दिवसांत या चित्रपटाने भारतात 245.50 कोटी रुपयांचा निव्वळ गल्ला जमवला आहे. यासोबतच ‘दृश्यम 3’ ने अजय देवगणच्या ‘गोलमाल अगेन’ (205.69 कोटी) आणि ‘दृश्यम 2’…

Read Full News

रवी परांजपे यांच्या निवडक चित्रांचे 'काष्ठ चित्र' माध्यमात अनावरण:स्मिता परांजपे यांच्या हस्ते अनावरण; चारुहास-भाग्यश्री पंडित यांनी साकारल्या कलाकृती

सर्जनशीलता म्हणजे एखाद्या परिचित गोष्टीकडे नव्या नजरेतून पाहणे आणि त्यातून अनपेक्षित, नाविन्यपूर्ण घडवून आणणे होय. वेगळा विचार करता येणे हीच खऱ्या कलाकाराची ओळख आहे. लेझर कटिंग आणि काष्ठ चित्र या कलाप्रकारात प्राविण्य मिळवत चारुहास पंडित व भाग्यश्री पंडित यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत देश-विदेशातील मानचिन्हांवर आपल्या कार्याची मोहोर उमटविली आहे. रवी परांजपे यांच्या मूळ…

Read Full News

Nana Patole Demands CCTV Footage Of Voting; Attacks Government In Nagpur

“केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी लोकशाही आणि संविधानाची उघड पायमल्ली करून भाजपला सोयीची ठरेल अशी व्यवस्था निर्माण केली आहे. स्वतःच्या दोन सहकारी निवडणूक आयुक्तांनी आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या मनमान . नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी केंद्रीय निवडणूक आयोगातील कथित सावळागोंधळ, ‘एसआयआर’ (SIR) प्रकरणावरून दिल्लीत सुरू असलेले इंडिया…

Read Full News