वृद्धाश्रमाच्या नावाखाली भूखंड लाटून आर्थिक गंडा:भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; नाशिक सत्र न्यायालयाचा दणका
धर्माच्या आणि समाजसेवेच्या नावाखाली अंधश्रद्धेचे जाळे विणून महिलांवर लैंगिक अत्याचार तसेच कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या नाशिकमधील कुख्यात भोंदू अशोक खरातच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वृद्धाश्रमासाठी घेतलेल्या भूखंडाच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने आज खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (मॅजिस्ट्रियल कस्टडी) सुनावली आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्यात पोलीस कोठडीची मुदत…