भंडाऱ्यात भाजप खासदार भारती पारधींच्या वाहनाची दुचाकीला धडक, दोघे गंभीर:तुमसर-रामटेक महामार्गावर अपघात, अपघातग्रस्त वाहन पोलिसांनी घेतले ताब्यात
मध्य प्रदेशातील बालाघाट येथील भाजप खासदार भारती पारधी यांच्या भरधाव वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची भीषण दुर्घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील उसर्रा गावाजवळ झालेल्या या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे पंजाबमधील दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. सुरजित सिंग आणि तसमिरा मेहरा अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. हे दोघेही पंजाबचे…