हिंगोलीत फटका गोदाम आग प्रकरण:भाजलेल्या तरुणासाठी अग्रसेन सेवा समिती सरसावली; जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करून 5 लाखांची मदत
हिंगोली शहरातील कपडागल्ली भागात फटाका गोदामामध्ये आगीवर नियंत्रण मिळवितांना गंभीर जखमी झालेल्या कृष्णा अग्रवाल या तरुणाच्या मदतीसाठी अग्रसेन सेवा समिती सरसावली असून महाराजा अग्रसेन जयंती निमित्त रविवारी ता. 11 आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करून जमा होणारी रक्कम अग्रवाल कुटुंबाच्या हवाली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. हिंगोली…