सणांच्या तोंडावर सोयाबीन काढणीला वेग:पिकांबाबत मात्र शेतकऱ्यांना चिंता, तालुक्यातील 22 हजार 207 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी
भातकुली तालुक्यातील २२ हजार २०७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी आता कापणी आणि मळणीच्या कामात स्वतःला गुंतवले आहे. परंतु परतीच्या पावसाच्या भीतीमुळे काढणी केलेले पीक सुरक्षित ठेवण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे. दसरा-दिवाळीसारख्या सणासुदीचे दिवस जवळ असल्यामुळे तालुक्यात सोयाबीन काढणीला वेग आला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू झाली आहे. कापणी केलेले पीक शेतातच राहिल्यास…