शिवन्यात महामार्गावरील अतिक्रमणावर हातोडा:रस्ता मोकळा करण्याचे आदेश, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय रस्ते प्राधिकरणाकडून मोहीम
अजिंठा-बुलढाणा महामार्गावरील शिवना येथे अनधिकृत अतिक्रमण हटवण्यासाठीच्या मोहिमेला गुरुवारी सुरुवात करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय रस्ते प्राधिकरणाने ही कारवाई हाती घेतली असून, अतिक्रमणामुळे कोंडलेला या महामार्गाचा श्वास आता मोकळा होणार आहे. खान्देश, विदर्भ व मराठवाड्याच्या सीमांना जोडणाऱ्या या महत्त्वाच्या महामार्गावर शिवना येथे रस्ते अपघातांना आळा घा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अतिक्रमण काढले जात आहे….