Headlines

राहुल गांधींसह खासदारांवर लाठीचार्ज:काँग्रेसचे पुण्यात बालगंधर्व चौकात आंदोलन; 'लोकशाहीसाठी काळा दिवस' पाळला

निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत उत्तरदायित्वाची मागणी करण्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतरकडे शांततामय व संविधानिक मार्गाने जात असलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी अडवून त्यांच्यावर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले. काँग्रेसने गुरुवारचा दिवस ‘भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस’ म्हणून पाळला. या आंदोलनाचे नेतृत्व पुणे शहर…

Read Full News

सासवडमध्ये गावठी पिस्तुलासह सराईत आरोपीला अटक:96 हजार किमतीचे पिस्तूल, मॅगझीन आणि दुचाकी जप्त; आरोपीवर अनेक गुन्हे दाखल

बेकायदा गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत आरोपीला सासवड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. आरोपीकडून पिस्तूल, मॅगझीन आणि दुचाकी असा एकूण ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सासवड येथील सैनिक कॅन्टीनच्या पाठीमागील परिसरात करण्यात आली. रोहित राजू माने (वय २४, रा. गुजरवाडी, दत्तनगर, निंबाळकरवस्ती, कात्रज, पुणे) असे अटक करण्यात…

Read Full News

विकसित भारतासाठी युवा पिढीची बुद्धी, ऊर्जा व नवकल्पना महत्त्वाची:केंद्रीय राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे यांचे आर्यन्स ग्रुपच्या परिषदेत आवाहन

“युवा पिढीची ऊर्जा, नवकल्पना यांतून विज्ञान-तंत्रज्ञान आणि हरित उर्जेच्या क्षेत्रात देश आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल करीत आहे. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी युवा पिढीने आपली बुद्धिमत्ता, ऊर्जा आणि नवकल्पनांचे विश्व देशाच्या प्रगतीसाठी उपयोगात आणावे,” असे मत केंद्रीय कोळसा व खाण मंत्रालयाचे राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे यांनी व्यक्त केले. विकासामुळे नागरिकांचे स्वास्थ्य अबाधित राहते व तीच स्वस्थ मानसिकता देशाला…

Read Full News

दुष्काळ, कर्जमाफीसाठी तुपकरांचा सरकारला अल्टिमेटम:मायक्रोफायनान्सच्या दंडेलशाहीला आवर घालण्यासाठी 13 मागण्यांचे निवेदन.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी आयुक्तांमार्फत मुख्यमंत्र्यांना १३ प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले. मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीमुळे पिकांचा उत्पादन खर्च वाढला असून उत्पन्न घटले आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, तसेच प्रलंबित…

Read Full News

अमरावती सुपर स्पेशालिटी कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यांपासून वेतन नाही:किमान वेतनही मिळत नसल्याने काळे झेंडे दाखवत रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन.

अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी आज, गुरुवारी काळे झेंडे दाखवत आंदोलन केले. त्यांना गेल्या पाच महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. किमान वेतनही मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष आहे. रुग्णालयात ११२ चतुर्थश्रेणी कर्मचारी बाह्य यंत्रणेमार्फत काम करतात. त्यांना दरमहा सात हजार रुपयांपेक्षा कमी वेतन अनियमितपणे मिळते. बोनस व इतर कल्याणकारी योजनांचा लाभही नाही. आरोग्य सेवा…

Read Full News

CAPF General Administration Act 2026

नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात CAPF (जनरल अॅडमिनिस्ट्रेशन) कायदा २०२६ लागू झाला आहे. गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, हा कायदा ८ ऑक्टोबरपासून लागू आहे. नवीन कायदा CAPFमधील ग्रुप-A जनरल ड्युटी आणि इतर अधिकाऱ्यांच्या भरती, पदोन्नती, प्रतिनियुक्ती आणि सेवा अटींसाठी एकसमान चौकट निश्चित करतो. सर्वोच्च न्यायालयात हजारो CAPF अधिकारी या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरू…

Read Full News

तन्वी जोगदंडला स्क्वॉशमध्ये कांस्यपदक:विभागीय स्पर्धेसाठी निवड

विभागीय क्रीडा संकुल येथे नुकत्याच पार पडलेल्या मनपा अंतर्गत जिल्हास्तरीय शालेय स्क्वॉश क्रीडा स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलींच्या गटात जैन इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी तन्वी जोगदंड हिने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. या यशामुळे तन्वीची आगामी विभागीय शालेय स्क्वॉश क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेत तन्वीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पदकाला गवसणी घातली. तिच्या या कामगिरीमुळे शाळेच्या…

Read Full News

दुष्काळाच्या झळा, पीक नुकसान अन् पाणीटंचाईचा केंद्र घेणार आढावा:8 ते 11 ऑक्टोबरदरम्यान केंद्रीय पथक महाराष्ट्र दौऱ्यावर, प्रत्यक्ष पाहणीनंतर केंद्राला सादर होणार सविस्तर अहवाल

खरीप हंगाम 2026 मध्ये राज्यातील काही भागांमध्ये निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि पिकांचे नुकसान याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे. 8 ते 11 ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात राज्यातील पावसाची स्थिती, शेतीपिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती याचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाणार आहे. केंद्राच्या कृषी व शेतकरी…

Read Full News

त्र्यंबकेश्वर मंदिर 2 महिने बंद!:सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी 15 किंवा 16 ऑक्टोबरपासून भाविकांना प्रवेश बंद

महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर काही काळ भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. मंदिर परिसरातील प्रस्तावित विकासकामे, रस्ते विस्तारीकरण आणि भाविकांच्या गर्दीचे नियोजन लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जात आहे. प्राथमिक नियोजनानुसार 15 किंवा 16…

Read Full News

गोपनीय माहितीची खातरजमा करून चिकलठाणा पोलिसांचा छापा:कचनेर तांड्यात गांजाची 241 झाडे जप्त, 182.02 किलो मुद्देमालाची किंमत 27.30 लाख रुपये; 5 जणांवर NDPS अंतर्गत कारवाई

कचनेर तांडा नं. 5 परिसरातील एका शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने शेतावर छापा टाकला. या कारवाईत गांजाची लहान-मोठी अशी तब्बल 241 झाडे जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या गांजाचे एकूण वजन 182.02 किलो असून, त्याची अंदाजे किंमत 27 लाख 30 हजार 300…

Read Full News