Headlines

याला जिवंत सोडू नको म्हणत पोलिसावर चाकूहल्ला:करोडी परिसरातील आंबेडकर चौकात मध्यरात्रीची घटना, हटकल्याच्या रागातून तरुणीचे कृत्य

मध्यरात्री विनाकारण फिरून गोंधळ घालणाऱ्या तरुण-तरुणींना घरी जा असे सांगणे एका पोलिस अंमलदाराच्या जिवावर बेतले. सोबतच्या तरुणांनी पोलिसाला पकडून ठेवत ‘याला जिवंत सोडू नको’ अशी चिथावणी दिली. त्यानंतर एका तरुणीने पोलिसावर चाकूहल्ला केला. करोडी परिसरातील आंबेडकर चौकात बुधवारी मध्यरात्री १.१० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी दौलताबाद पोलिसांनी ३ महिलांसह ८ जणांवर गुन्हा दाखल…

Read Full News

कापसाच्या 4 पैकी 1 शेतात बेकायदा एचटीबीटी बियाणे:खर्च 93% कमी, मजुरांची गरज घटली, तेलंगणात 66%, महाराष्ट्रात 58% लागवडीचा अंदाज

Marathi News National 1 In 4 Cotton Fields Have Illegal HTBT Seeds, Cost Reduced By 93%, Need For Labor Reduced, Estimated Cultivation At 66% In Telangana, 58% In Maharashtra नवी दिल्ली2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात शासकीय मंजुरी नसलेल्या, तणनाशकाचा मारा सहन करू शकणाऱ्या बीटी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. एका प्रत्यक्ष पाहणीनुसार, २०२५-२६ च्या…

Read Full News

वडवणीची घटना:सिमेंट मिक्सरमध्ये पडल्यामुळे‎ 16 वर्षीय बालकामगार ठार‎, कामगार पळून गेल्याने मृतदेह मशीनमध्ये ७ तास अडकला‎

वडवणी तालुक्यातील रुई पिंपळ्यातील सोना फाटा ते‎ खडकी रस्त्यावर असलेल्या बाळराजे कन्स्ट्रक्शनच्या ‎‎सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय ‎‎बाल कामगाराचा मृत्यू झाला. ही‎‎ घटना गुरुवारी दुपारी २ वाजता ‎‎घडली. घटना घडताच प्लँटवरील सर्व कर्मचारी पळून गेले. त्यामुळे‎‎ मृतदेह मिक्सरमध्ये ७ तास‎‎ मशीनमध्ये अडकून पडला होता.‎ ‎सोन्नाखोट्टा ते देवळा या‎रस्त्याच्या कामासाठी रुई (पिंपळा) येथे आर.एम.सी.‎प्लँट उभारला आहे….

Read Full News

दिव्य मराठी एक्स्पोज:कोरोनाच्या 22 मृतांवर 6 वर्षांनी उपचार दाखवून लाटले 2 कोटी, नाशिकच्या 3 हॉस्पिटलचा प्रताप

कोरोना काळातील 22 मृत रुग्णांवर 6 वर्षांनंतर उपचार केल्याचे दाखवून खोटे क्लेम करीत नाशिकमधील तीन रुग्णालयांनी सुमारे 2 कोटी रुपये लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या रुग्णांनी महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य (जीवनदायी) आणि आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेतल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले. याप्रकरणी वरळी पोलिसांत तिन्ही रुग्णालयांच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूरचे शिव…

Read Full News

पात्र नागरिकांसाठी उद्यापासून 2दिवस सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे:अर्जांवर दावे-हरकतींसाठी ऑफलाइन 12ऑक्टोबरपर्यंतची मुदत

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने मतदार यादीत एकही पात्र मतदार वंचित राहू नये तसेच कोणत्याही अपात्र व्यक्तीचे नाव यादीत राहू नये, याची खात्री करण्यासाठी विशेष उपाययोजनांची घोषणा केली आहे. मसुदा मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांची ओळख पटवण्यासाठी विशेष घरभेट मोहीमही राबवली जात आहे. बीएलओ पात्रतेची पडताळणी केल्यानंतर अशा नव्या मतदारांकडून नमुना क्रमांक ६ भरून…

Read Full News

अँटिलियाप्रकरणी सुनावणीवेळी उच्च न्यायालयास आश्चर्य:एपीआय सचिन वाझे मर्सिडीजमधून फिरतो, फाइव्हस्टारमध्ये राहतो कसा?- हायकोर्ट

माजी पोलिस सहायक निरीक्षक सचिन वाझे हे मर्सिडीजमधून मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जातो तसेच पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतो कसा? अशी विचारणा करून मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत गुरुवारी आश्चर्य व्यक्त केले. वाझे हे २०२१ मधील ‘अँटिलिया’ स्फोटके प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने यावर महत्त्वपूर्ण टिप्पणी…

Read Full News

अमरावतीत इंडिया आघाडीचा निवडणूक आयुक्त हटावसाठी मोर्चा:काँग्रेस, राकाँ, कम्युनिस्टांचा सहभाग, आंदोलकांनी बॅरिकेड तोडले

अमरावतीत इंडिया आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. एसआयआर प्रक्रियेतील अनियमितता आणि मतदारांची नावे वगळल्याच्या आरोपांमुळे हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी बॅरिकेड तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. दुपारी साडेबारा वाजता गर्ल्स हायस्कूल चौकातून मोर्चा सुरू झाला. मोर्चात…

Read Full News

विधान परिषद निवडणुकीतून पहिल्या दिवशी कुणीही माघार घेतली नाही:30 उमेदवार रिंगणात, आज शेवटचा दिवस; सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी (गुरुवार) कुणीही माघार घेतली नाही. त्यामुळे सध्या निवडणुकीच्या रिंगणात ३० उमेदवार कायम आहेत. आज, शुक्रवार (९ ऑक्टोबर) उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत माघार घेण्याची मुदत आहे. त्यानंतर सायंकाळपर्यंत निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबरला मतदान…

Read Full News

दसरा-दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन काढणीला वेग:परतीच्या पावसामुळे पीक सुरक्षित ठेवण्याची शेतकऱ्यांना चिंता

भातकुली तालुक्यात २२ हजार २०७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. दसरा-दिवाळी जवळ आल्याने शेतकरी आता काढणी आणि मळणीच्या कामात गुंतले आहेत. परतीच्या पावसाच्या भीतीमुळे काढणी केलेले पीक सुरक्षित ठेवण्याची चिंता आहे. पावसाने नुकसान टाळण्यासाठी शेतकरी सकाळपासून शेतात दाखल होत आहेत. तालुक्यात कापूस, तूर, उडीद, मका, मुगाचीही पेरणी झाली. टाकरखेडा संभूसह अनेक गावांमध्ये सोयाबीन काढणी वेगाने सुरू…

Read Full News

पोलिस कर्तव्य मेळाव्यात IT, अँटी सबोटेज विजेत्यांना पदके:फोटोग्राफी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना सुवर्ण, रजत, कास्य पदके देऊन गौरव

एकवीसव्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गुरुवारी (दि. ८) सुवर्ण, रजत आणि कास्य पदके देऊन गौरव करण्यात आला. गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) वतीने राज्य राखीव पोलीस बलाच्या (एसआरपीएफ) गट क्रमांक २ च्या मैदानावर हा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. दि. ५ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या कर्तव्य मेळाव्यात विविध…

Read Full News