Headlines

बॉयलर उद्योगात ‘सेफ्टी फर्स्ट’सह AI तंत्रज्ञानाला चालना:कुशल मनुष्यबळासाठी नागपुरात कौशल्य विकास केंद्र उभारणार – आकाश फुंडकर

ऊर्जा निर्मितीपासून साखर, वस्त्रोद्योग, रसायने, पेट्रोकेमिकल्स, अन्नप्रक्रिया, औषधनिर्मिती, कागद उद्योग आणि रिफायनरीजपर्यंत विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये बॉयलरची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे बॉयलरची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि विश्वासार्हता यांचा थेट संबंध औद्योगिक उत्पादकता, कामगारांची सुरक्षितता, ऊर्जेचा कार्यक्षम वापर, पर्यावरण आणि देशाच्या औद्योगिक स्पर्धात्मकतेशी आहे. या पार्श्वभूमीवर बॉयलर क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि सुरक्षिततेला चालना देण्यासाठी राज्य…

Read Full News

तेरवाडजवळ भरधाव डंपरचा भीषण अपघात:भरधाव डंपरची 3 दुचाकींना जोरदार धडक, तिघांचा मृत्यू, चालक डंपर सोडून पसार

हेरवाडहून कुरुंदवाडच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव डंपरने तेरवाड (ता. शिरोळ) येथे तीन दुचाकींना मागून जोरदार धडक दिल्याची भीषण घटना घडली. या अपघातात एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला असून, चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे तेरवाड परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार,…

Read Full News

कर्जाचा वाढता बोजा, शासनाकडे 2.50 कोटींचे बिल रखडले:अमरावतीत कंत्राटदाराने जीवन संपवले

जिल्ह्यातील जरुड येथील 42 वर्षीय कंत्राटदार सुनील वागद्रे यांनी आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूमागे आर्थिक अडचणी आणि शासनाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मोठी देयके कारणीभूत असल्याचा दावा अमरावती जिल्हा कंत्राटदार संघटनेने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील वागद्रे हे बांधकाम क्षेत्रातील कंत्राटदार होते. त्यांच्या कामाचे शासनाकडे सुमारे…

Read Full News

अंबरनाथमध्ये 19.99 कोटींचा ‘उमेद मॉल’:महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार वर्षभर हक्काची बाजारपेठ

महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना कायमस्वरूपी आणि हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अंबरनाथ येथे ‘उमेद मॉल’ अर्थात जिल्हा विक्री केंद्र उभारण्याच्या कामाला महाराष्ट्र शासनाने 19 कोटी 99 लाख 60 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. ग्रामविकास विभागाने 7 ऑक्टोबर 2026 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. मुख्यमंत्री…

Read Full News

ट्रेनमधून बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह आंध्र प्रदेशात सापडला:विशाखापट्टणमहून गुवाहाटीकडे येत होती, मैत्रिणीला म्हणाली होती- मुले त्रास देत आहेत

ट्रेनमधून प्रवास करताना बेपत्ता झालेल्या आसाममधील एका आदिवासी विद्यार्थिनीचा मृतदेह बुधवारी सकाळी आंध्र प्रदेशात सापडला. आसामच्या कामरूप जिल्ह्यात राहणारी 20 वर्षीय हिमाश्री बोरो विशाखापट्टणमहून गुवाहाटीकडे जात होती. ती ट्रेनमध्ये प्रवास करत होती. विद्यार्थिनीच्या आईने सांगितले की, ती 5 ऑक्टोबर रोजी रात्री 11:50 वाजता विशाखापट्टणमहून डिब्रूगड विवेक एक्सप्रेस (क्रमांक 22503) ट्रेनमध्ये बसली होती. ही ट्रेन 7…

Read Full News

हिंगोलीत वडेट्टीवारांचा सरकारवर चौफेर हल्लाबोल:शेतकरी आत्महत्या, 6 तास लोडशेडिंग अन् शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा

महाराष्ट्र 1972 नंतरच्या सर्वात भीषण दुष्काळी संकटाला सामोरे जात असून, मराठवाड्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तलावांमध्ये पाणी शिल्लक नाही, विहिरी कोरड्या पडल्या आहेत आणि आगामी काळात पिण्याच्या पाण्याचेही मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सरकारने केवळ शासन निर्णय (GR) काढून शेतकऱ्यांची बोळवण न करता तातडीने हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत जाहीर करावी,…

Read Full News

मस्क यांच्या आरोपांवर सरकारचे स्पष्टीकरण:म्हटले- उद्योगपती स्टारलिंकला रोखत आहेत, हे चुकीचे; नियम सर्वांसाठी समान

भारत सरकारने एलॉन मस्क यांच्या त्या आरोपांना फेटाळून लावले आहे, ज्यात त्यांनी दावा केला होता की काही भारतीय उद्योगपती मक्तेदारी कायम ठेवण्यासाठी स्टारलिंकला भारतात येऊ देत नाहीत. सरकारने आज म्हणजेच ८ ऑक्टोबर रोजी सांगितले की, देशातील सॅटेलाइट कम्युनिकेशन सेवांसाठी ठरवलेले नियम सर्वांसाठी समान आहेत. कोणाशी भेदभाव करण्यासाठी नियम लागू केले जात आहेत, असे म्हणणे पूर्णपणे…

Read Full News

मुलुंड पूर्वेत कामगारांच्या संक्रमण शिबिराला भीषण आग:7 ते 8 सिलिंडरचे स्फोट, सुदैवाने जीवितहानी टळली

मुलुंड पूर्वेकडील नवघर परिसरात बांधकाम कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या संक्रमण शिबिराला गुरुवारी दुपारी भीषण आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. आगीदरम्यान एका सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर शिबिरातील इतर सिलिंडरही स्फोट होऊन आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून, सर्व कामगारांना वेळीच सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. मुलुंडच्या नवघर परिसरात धारावी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत…

Read Full News

शिवसेना पक्ष-चिन्हावर सर्वोच्च सुनावणी:फुटीच्या दिवशी विधिमंडळात आमचेच बहुमत! शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला

“राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह हे वाळूच्या कणांसारखे किंवा घड्याळाच्या लंबकाप्रमाणे सतत इकडून तिकडे फिरवता येत नाही. पक्षाचे अधिकृत चिन्ह ही मतदारांची त्या पक्षाशी असलेली भावनिक आणि राजकीय नाळ असते. ज्या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला, त्या दिवशी आमच्याकडे विधिमंडळातील स्पष्ट बहुमत, मते आणि प्राथमिक सदस्यत्व शाबूत होते. नंतरच्या कायदेशीर घडामोडींमुळे किंवा भविष्यातील अपात्रतेच्या शक्यतेमुळे…

Read Full News

नाना पाटेकर यांच्याशी भास्करची शेवटची बातचीत:म्हणाले होते- वडिलांच्या उपचारांसाठी पैसे मित्रांनी दिले होते, आयुष्यभर याचं दुःख राहिलं

नाना पाटेकर यांचे गुरुवारी सकाळी वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील त्यांच्या घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे सुमारे ४५ मिनिटे सीपीआर देण्यात आला; मात्र डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत. नाना आपल्या मागे चित्रपटांसोबतच असे अनेक किस्से सोडून गेले, ज्यातून त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आणि नातेसंबंधांची झलक मिळते. डिसेंबर २०२४…

Read Full News