Headlines

काँग्रेसकडून 3 उमेदवारांची यादी जाहीर:नागपूर पदवीधर, पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा

राज्यातील विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आघाडी घेत नागपूर पदवीधर, पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांसाठी आपल्या तीन उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. यामुळे उमेदवारीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीनुसार, दोन विद्यमान आमदारांना पुन्हा…

Read Full News

मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीसाठी मोठी बातमी:मानखुर्दमध्ये 14 एकर जागा चित्रीकरणासाठी उपलब्ध; महसूल विभागाची हिरवी झेंडी

मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मानखुर्दमधील अंदाजे 14 एकर शासकीय जमीन आता चित्रपट, मालिका आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या बाह्य चित्रीकरणासाठी उपलब्ध होणार आहे. महसूल विभागाने या जागेचा वापर चित्रीकरणासाठी करण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. ही जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने, मुंबईतील चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक क्षेत्राला मोठी सुविधा मिळणार…

Read Full News

आमदार परगट सिंह पंजाब काँग्रेसचे नवे अध्यक्ष:मंत्री आणि ऑलिम्पियन हॉकी संघाचे कर्णधार राहिले आहेत; सकाळी वडिंग यांनी राहुल गांधींकडे राजीनामा सुपूर्द केला होता

काँग्रेसने जालंधर कँटचे आमदार परगट सिंह यांची पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटी (PPCC) अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशात आराधना मिश्रा यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही राज्यांमध्ये 2027 मध्ये निवडणुका होणार आहेत. यापूर्वी शुक्रवारीच खासदार अमरिंदर सिंह राजा वडिंग यांनी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. दिल्लीतील 10 जनपथ येथील…

Read Full News

Mumbai CPWD Engineer Arrested In Bribery Case

सरकारी कार्यालयांमधील लाचखोरीच्या प्रकरणांवर सध्या तपास यंत्रणांकडून जोरदार कारवाई केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईत केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (CPWD) एका कार्यकारी अभियंत्यासह पाच जणांना सीबीआयने अटक केली आहे. वडाळा येथील एका भूखंडा . या मोठ्या कारवाईत नवी मुंबईतील वाशी येथील एका कार्यकारी अभियंत्यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याशिवाय, मुंबईतील एका रिअल इस्टेट ग्रुपचा उपाध्यक्ष,…

Read Full News

शिवाजी पार्कमध्ये सीजेपीचे विनापरवानगी आंदोलन:अभिजीत दिपकेंसह चौघांवर पोलिसांत तक्रार; सरकारी आदेशांचे उल्लंघन केल्याचा आरोप

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात आज मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देशभरातून आलेल्या ‘जेन झी’ तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सीजेपीने या आंदोलनाचा इशारा आधीच दिला होता, मात्र पोलिसांनी या आंदोलनाला अधिकृत परवानगी नाकारली होती. तरीही हे आंदोलन पार पडल्याने आता नव्या वादाला…

Read Full News

Dhananjay Munde Warns Maharashtra Govt Over MPSC Student Protest

राज्यात आज महात्मा गांधी जयंतीचा दिवस आंदोलनांचा दिवस ठरल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर सीजेपीने आंदोलन करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर दुसरीकडे पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे मोठे . शास्त्री रस्त्यावर सुरू असलेल्या या विद्यार्थी आंदोलनाची दखल घेत माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली….

Read Full News

रिलायन्स आंध्र प्रदेशमध्ये ₹1 लाख कोटींची गुंतवणूक करणार:अनंत अंबानी म्हणाले- कंप्रेस्ड बायोगॅस प्लांटमुळे 3 लाख नोकऱ्या मिळतील

रिलायन्स आंध्र प्रदेशात कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांट उभारण्यासाठी 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यात 3 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळेल आणि आगामी काळात आंध्र प्रदेश सरकारला सुमारे 60,000 कोटी रुपयांचा महसूल मिळेल. कंपनीचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी आज म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी मदनपल्ले येथे आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली. ते ‘रायलसीमा…

Read Full News

सातारा गुन्हेगारी वार्ता:आकलेत हप्त्याच्या वादातून हॉटेलवर धुडगूस; लाकडी दांडके, लोखंडी रॉड, कोयत्याने तोडफोड

आकले (ता. जि. सातारा) येथील साईसागर हॉटेलमध्ये हप्ता मागण्याच्या कारणावरून २५ ते २८ जणांच्या जमावाने धुडगूस घालत हॉटेलची तोडफोड केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी रात्री घडली. लाकडी दांडके, लोखंडी रॉड आणि कोयता घेऊन आलेल्या जमावाने टेबल, खुर्च्या, वाहने व अन्य साहित्याची तोडफोड करून सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले. या घटनेत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत…

Read Full News

हैदराबादमध्ये संतोषी मातेची मूर्ती तोडण्याचा प्रयत्न:आरोपीने मूर्तीवर लाकडाने हल्ला केला; लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

हैदराबादमधील दिलसुखनगर बस डेपोच्या जवळ शुक्रवारी एका व्यक्तीने मंदिरातील पुजाऱ्यावर हल्ला केला. त्याने देवीच्या मूर्तीवरही काठीने वार केले. ही घटना संतोषी माता मंदिरात घडली. मात्र मंदिरात उपस्थित असलेल्या लोकांनी आरोपीला तात्काळ पकडले. लोकांनी आरोपीला मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिस आरोपीच्या मानसिक स्थितीचीही तपासणी करून घेत आहेत. आरोपीने…

Read Full News

पुणे रेल्वेचे वाहतूक निरीक्षक किरण होजगे सेवानिवृत्त:34 वर्षांच्या सेवेत पुणे स्थानकाचा विकास, सुरक्षितता वाढवण्यात दिले योगदान

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील वाहतूक निरीक्षक (नियोजन) किरण मारुती होजगे हे ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. पुणे रेल्वे स्थानकावरील वाढता वाहतूक ताण कमी करण्याबरोबरच रेल्वेची सुरक्षितता, प्रवासी व मालवाहतूक क्षमता वाढविणे आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या नियोजनात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. पुणे रेल्वे स्थानकावरील वाढता ताण कमी करण्यासाठी अतिरिक्त सहा फलाटांच्या निर्मितीचे…

Read Full News