Headlines

फुलंब्री:बोरगाव अर्जच्या विवान बलांडेला तलवारबाजी स्पर्धेत कांस्यपदक

जम्मू-काश्मीर येथील जम्मू विद्यापीठात २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १४ व्या मिनी व ८ व्या चाइल्ड राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथील खेळाडू विवान भाऊसाहेब बलांडे याने चमकदार व दमदार कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर थेट कांस्यपदक पटकावले आहे. वैयक्तिक क्रीडा प्रकारात हे घवघवीत यश मिळवणारा विवान हा…

Read Full News

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्यावी; काँग्रेसची मागणी:शेतमजुरांना 25 हजार रुपये द्यावेत, महसूलमंत्री बावनकुळे यांना निवेदन‎

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये, तर शेतमजुरांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी, अशी मागणी खासदार डॉ. कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पटेल, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निमेश पटेल यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली…

Read Full News

तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राची वार्षिक सभा उत्साहात:गंगापूरमध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

महिला आर्थिक विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत स्थापित तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र, गंगापूरची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबर रोजी दीपाली लॉन्स, गंगापूर येथे पार पडली. प्रास्ताविक सी.एम.आर.सी. व्यवस्थापक सुनिता सहाने यांनी केले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते केंद्राच्या १७ व्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. या वार्षिक सभेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय अधिकारी…

Read Full News

पीरबावड्यात शेतकऱ्यांचा पंचनाम्यांना विरोध:दुष्काळ जाहीर असताना वैयक्तिक पंचनामे कशासाठी; शेतकऱ्यांचा सवाल‎

शासनाने सरसकट दुष्काळ जाहीर केलेला असताना वैयक्तिक पंचनामे करण्यासाठी गावात आलेल्या तलाठी व सहायक कृषी अधिकाऱ्यांना पीरबावडा येथील शेतकरी व नागरिकांनी विरोध केला. दुष्काळाची भीषण परिस्थिती सर्वत्र स्पष्ट असताना प्रत्येक शेतकऱ्याचा स्वतंत्र पंचनामा करण्याची प्रक्रिया राबवू नये, अशी भूमिका घेतली. वैयक्तिक पंचनामे करण्यासाठी अधिकारी पिरबावडा येथे दाखल झाले असता शेतकरी एकत्र आले. त्यांनी पंचनामे करण्यास…

Read Full News

विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू:कर्जबाजारीपणास कंटाळून पानवडोद येथे उचलले टोकाचे पाऊल‎

सिल्लोड तालुक्यातील पानवडोद येथील २९ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा विषारी औषध प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. सागर रंगनाथ दौंड (२९, रा. पानवडोद, ता. सिल्लोड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे नातेवाइकांनी सांगितले . सागर दौंड यांनी रविवारी रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतगट क्रमांक ३३२ मध्ये विषारी…

Read Full News

चिकटगावला सामाइक बांधाच्या वादावरून शेतकऱ्याला मारहाण:चौघांवर वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎

वैजापूर तालुक्यातील चिकटगाव शिवारात गट नंबर १८१ मधील सामाईक बांधाच्या वादातून ७० वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून शिऊर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी समाधान कारभारी भगत (३५, रा. चिकटगाव) हे ३० सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास शेतात काम…

Read Full News

सोबलगाव येथे पोलवर चढलेल्या तरुणाचा तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू:तरुण विजेच्या पोलवर चढल्याचे कारण अस्पष्ट, आज होणार अंत्यसंस्कार‎

विद्युत पोलवरील विजेच्या तारेला अचानक स्पर्श झाल्याने २७ वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना सोबलगाव (ता. खुलताबाद) शिवारात घडली. नीलेश हरी बनसोड (२७, रा. सोबलगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बाजारसावंगी जवळील पाडळी शिवारामधील सोबलगाव रस्त्यावर असलेल्या महावितरणच्या विजेच्या पोलवर निलेश हा तरुण गुरुवारी सायंकाळच्या सुमारास चढला होता. या दरम्यान…

Read Full News

ईशान्येकडील राज्यांमध्ये 7 दिवस पावसाचा इशारा:उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये 12 हून अधिक गावे पाण्याखाली, बिहारमधील 6 जिल्ह्यांत पूर

हवामान विभागाने ईशान्येकडील राज्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे पुढील सात दिवस पावसाचा इशारा जारी केला आहे. तसेच केरळ, लक्षद्वीप आणि तामिळनाडूमध्ये ताशी 40-50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये सई नदीचे पाणी 12 हून अधिक गावांमध्ये शिरले आहे. हजारो बिघे भातशेती पाण्याखाली गेली आहे. तसेच कुशीनगरमध्ये गंडक…

Read Full News

फुलंब्री‎:गिरसावळीतील शेतकऱ्याचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू

निसर्गाची वक्रदृष्टी आणि डोक्यावर वाढणारा कर्जाचा डोंगर यामुळे त्रस्त एका शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवनयात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे. घाटी रुग्णालयात १५ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शुक्रवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. विष्णू विठ्ठल गाडेकर (४४, रा. गिरसावळी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. चालू हंगामात पिकांतून चांगले उत्पन्न मिळेल या आशेने त्यांनी सोसायटी, सावकारी कर्ज…

Read Full News

पंचनाम्यासाठीच्या पथकाला परत पाठवले:गेवराई पायगा येथील घटना, दुष्काळ जाहीर असताना पंचनामे कशासाठी; शेतकऱ्यांचा सवाल‎

फुलंब्री तालुक्यात दुष्काळ जाहीर असतानाही प्रशासनाकडून पिकांचे पंचनामे सुरू असल्याने शेतकऱ्यांमधून संताप आहे. याच रागातून गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांच्यासह संतप्त शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर आलेल्या महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पाहणी पथकाला शुक्रवारी माघारी धाडले. फुलंब्री तालुक्यात राज्य सरकारने आधीच तालुका दुष्काळी घोषित केला आहे, मग प्रत्येक शेतकऱ्याचा स्वतंत्र पंचनामा कशासाठी केला जात…

Read Full News