Headlines

मनमाडमध्ये जिल्हास्तरीय कुमार गट कबड्डीचा थरार; 32 संघ मैदानात:उद्या अंतिम सामना; विजेत्यां खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी होणार निवड‎

येथे ५३ व्या नाशिक जिल्हा कुमार गट मुले कबड्डी अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेला शुक्रवारी (दि. २) उत्साहात सुरुवात झाली. जय भवानी अद्ययावत व्यायामशाळेच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती पुरस्कार विजेते सुनील जाधव यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील ३२ संघांनी सहभाग घेतला आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात १६ संघांमध्ये साखळी पद्धतीने सामने झाले. त्यानंतर…

Read Full News

IIT Bombay Tops JEE Advanced 2026 Admissions

नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक IIT-JEE 2026 मध्येही IIT बॉम्बे टॉपर्सची पहिली पसंती ठरले. टॉप-100 मध्ये स्थान मिळवलेल्या 68 आणि टॉप-500 पर्यंत रँक मिळवलेल्या 183 विद्यार्थ्यांनी IIT बॉम्बेमध्ये प्रवेश घेतला. ही माहिती IIT-JEE 2026 च्या संयुक्त अंमलबजावणी समितीच्या अहवालातून समोर आली आहे. यावेळी JEE अ‍ॅडव्हान्सचे आयोजन IIT रुडकीने केले होते. अहवालानुसार, देशातील 23 IIT पैकी…

Read Full News

कामगिरी:आशियाई रौप्यविजेत्या सर्वेशचे जल्लोषात स्वागत

जपानमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत २.२५ मीटर उंच उडीची नोंद करत रौप्यपदक पटकावणाऱ्या देवगावचा भूमीपूत्र सर्वेश अनिल कुशारे याचे शुक्रवारी (दि. २) सकाळी देवगाव-रुई रोडपासून जल्लोषात स्वागत करण्यात आले. . सर्वेशच्या या कामगिरीने देवगावसह निफाड तालुका आणि नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. महिलांनी औक्षण…

Read Full News

महात्मा गांधी जयंती:सटाण्यामध्ये विद्यार्थ्यांनी सेवासंकल्प अभियानातून दिला स्वच्छतेचा संदेश

नगरपरिषदेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत विविध सामाजिक, पर्यावरणपूरक व स्वच्छताविषयक उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. यावेळी शहरात ६०० वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच बुद्ध विहार ते रेल्वे तलाव परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. या अभियानात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा सहआयुक्त शाम गोसावी,…

Read Full News

क्राइम:गणपती मंदिर परिसरात मंगळसूत्रे केली लंपास

एन-१ सिडको येथील काळा गणपती मंदिर परिसरात चतुर्थीनिमित्त झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्रे लंपास केल्याची घटना उघडकीस आली. सायंकाळी साडेचार ते सहा या वेळेत दीड तासाच्या अंतराने घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ७७ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले. एन-६ संभाजी कॉलनीतील रहिवासी गीता बनसोड या दर्शनानंतर मंदिराबाहेरील कटलरीच्या दुकानात गेल्या…

Read Full News

बससेवा अखेर सुरू:35 वर्षांनंतर दावरवाडीतून संभाजीनगरसाठी बससेवा

३५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पैठण तालुक्यातील दावरवाडी गावातून छत्रपती संभाजीनगरसाठी थेट एसटी बससेवा अखेर सुरू झाली आहे. १९९० मध्ये बंद पडलेली बससेवा पुन्हा सुरू झाल्याने ग्रामस्थांची अनेक वर्षांची मोठी गैरसोय दूर झाली असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे. पैठणकर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किशोर तांगडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने एसटी प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना…

Read Full News

दुष्काळ पाहणी दौरा:दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार : मंत्री बावनकुळे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा अत्यंत गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून खरीप हंगामातील सोयाबीन व कपाशीची पिके पाण्याअभावी पूर्णपणे करपून गेली आहेत. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही बिकट बनला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून दिवाळीपूर्वी थेट त्यांच्या बँक खात्यावर दुष्काळी अनुदान जमा करण्यात येईल, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि….

Read Full News

आमठाण्यात दुष्काळी पंचनाम्यांना सुरुवात:त्रिस्तरीय समिती बांधावर

आमठाणा व परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांच्या त्रिस्तरीय समितीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली जात आहे. सध्या तलाठी विशाल पाटील व ग्रामविकास अधिकारी बंसिधर पडूळकर यांच्यासह समितीतील संबंधित अधिकारी शेतावर जाऊन दुष्काळामुळे पिकांवर…

Read Full News

कौतुक:सुलतानाबादेत प्लास्टिक व कचऱ्याची होळी करून विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश‌

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुलतानाबाद येथील विद्यार्थ्यांनी गाव परिसरात स्वच्छता अभियान राबवत प्लास्टिक व कचरा गोळा केला. जमा केलेल्या कचऱ्याची होळी करून विद्यार्थ्यांनी ‘गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच’ असल्याचा संदेश ग्रामस्थांना दिला. या वेळी गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक कारभारी गायके, सरपंच अनिता कारभारी गायके, उपसरपंच सोन्याबापू गायके, ग्रामपंचायत अधिकारी…

Read Full News

पुरवठा विभागाची धावपळ:सोयगाव तालुक्यात 17 हजार 102 लाभार्थींची केवायसी प्रक्रिया रखडली

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण आणि अपात्र लाभार्थ्यांची छाननी या दोन्ही प्रक्रियांमुळे सोयगाव तालुक्यातील रेशन व्यवस्थेची सध्या मोठी फेरतपासणी सुरू आहे. एका बाजूला तालुक्यात ७९ हजार ६६६ लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असली, तरी १७ हजार १०२ लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे. दुसरीकडे केंद्र शासनाच्या ‘मिशन सुधार’ मोहिमेत १,१३२ शिधापत्रिका एनपीएच प्रवर्गात वर्ग करून त्यावरील…

Read Full News