भांबर्डा येथे शेतकऱ्यांना बेबाकीसह नवीन कर्ज मंजुरी पत्रांचे केले वितरण:खरीप हंगामासाठी दिलासा, आमदार अनुराधा चव्हाण यांची उपस्थिती
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा करमाडच्या कार्यक्षेत्रातील भांबर्डा (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्र तसेच नवीन पीक कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. . या कार्यक्रमास फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुराधाताई चव्हाण, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे जनरल मॅनेजर श्रीराम भोर आणि छत्रपती संभाजीनगर क्षेत्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक मनोहर…