Headlines

सलमानच्या जुन्या ट्विटवर राजस्थान रॉयल्सचे मजेदार उत्तर:‘झिंटाची टीम जिंकली का?’ यावर डोनोवन फरेरा म्हणाला- सॉरी भाऊ, आज नाही

IPL 2026 चा 40 वा सामना जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सने सलमान खानच्या जुन्या ट्विटला मजेशीर उत्तर दिले. खरं तर, मंगळवारी महाराजा यादवेंद्र सिंह स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सला 6 विकेट्सने हरवले. विजयानंतर राजस्थानने सोशल मीडियावर क्रिकेटर डोनोवन फरेराचा एक व्हिडिओ पोस्ट केला. यासोबतच सलमानचे 2014 सालचे जुने ट्विट पोस्ट केले, ज्यात त्याने विचारले होते, ‘झिंटाची टीम…

Read More

May Bank Holidays India | 12 Days Closure 2026

नवी दिल्ली15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात देशातील विविध राज्यांमध्ये एकूण 12 दिवस बँकांचे कामकाज बंद राहील. आरबीआयने जारी केलेल्या कॅलेंडरनुसार, पुढील महिन्यात 5 रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवार व्यतिरिक्त 5 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी बँका बंद राहतील. महिन्याची सुरुवात म्हणजेच 1 मे रोजी सुट्टीने होईल. महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा आणि कामगार दिन (लेबर…

Read More

भाजप विरुद्ध शिवसेना महायुतीत नवा संघर्ष:भूमाफिया असल्याच्या आरोपांनंतर पलटवार; सरनाईक गटाकडून मेहतांना नोटीस

भाईंदर पाडा येथील भूखंड वादावरून सत्ताधारी महायुतीत नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सरनाईक यांच्या विहंग समूहाने मेहतांना कायदेशीर नोटीस बजावली असून, बदनामीकारक आणि खोटी विधाने तात्काळ थांबवावीत, अशी मागणी केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण…

Read More

श्याम मानव यांचे आव्हान धीरेंद्र शास्त्रींनी स्वीकारले:म्हणाले – ज्यांना खाज असेल, त्यांनी दरबारात यावे; आमच्याकडील विद्येचे सादरीकरण करू

पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री नागपूरच्या रेशीम बागेत 26 ते 30 एप्रिलपर्यंत श्री राम कथा करत आहेत. या दरम्यान धीरेंद्र शास्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांच्यात श्रद्धा, अध्यात्म आणि विज्ञानावरून वाद वाढला आहे. श्याम मानव यांनी 80 लाख रुपयांचे आव्हान दिले होते. हे आव्हान धीरेंद्र शास्त्री यांनी स्वीकारले आहे. श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्रींना…

Read More

पारा ४१ वर; रस्ते ओस, ३ दिवस उष्णतेची लाट:उष्णतेचे चटके जाणवत असल्याने दुपारच्या वेळी शहरातील रस्ते ओस

प्रतिनिधी | अहिल्यानगर शहराच्या तापमानात तांत्रिकदृष्ट्या १ अंशाने घसरण झाली असली, तरी सूर्याच्या प्रखर किरणांनी नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. सोमवारी ४२ अंशांवर असलेला पारा मंगळवारी ४१ अंशांवर स्थिरावला. मात्र, असे असले तरी अति उष्णतेमुळे तीव्र उष्णतेचे चटके जाणवत असल्याने दुपारच्या वेळी शहरातील रस्ते ओस पडले होते. रात्रीच्या वेळीही उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या…

Read More

सिव्हिल आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय मेडिकल कॉलेज:एमबीबीएस प्रवेश ऑगस्टपासून; "एलओपी''नंतर जिल्ह्याला मिळणार १०० जागा‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालयाचा (सिव्हिल) चेहरा-मोहरा आता बदलला असून त्याचे अधिकृत नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालय’ असे करण्यात आले आहे. नाव बदलल्याने शैक्षणिक क्रांतीचे पाऊल पडले असले तरी, प्रत्यक्षात एमबीबीएसच्या १०० विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचसाठी जिल्ह्याला आणखी चार महिने वाट पाहावी लागणार आहे. केंद्र सरकारच्या ‘एनएमसी’कडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर ऑगस्ट २०२६ पासून ही…

Read More

युवकांनो, नोकरी मागणारे नव्हे, देणारे बना:अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांचे आवाहन‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर “ग्रामीण आणि मागासवर्गीय भागातील युवक-युवतींनी केवळ नोकरीच्या मागे न धावता यशस्वी उद्योजक होऊन इतरांना नोकऱ्या देणारे बनावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाला सर्वश्रेष्ठ मानले आहे, तेच ज्ञान आणि कौशल्य तुमचे भविष्यातील ‘ब्रेड अँड बटर’ ठरेल,” असे प्रतिपादन अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी केले. अहिल्यानगर मध्ये दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री…

Read More

राज्य सरकार बोलावणार विशेष अधिवेशन:महिला आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय अधिवेशन; मंत्रालयात हालचाली सुरू झाल्याचा दावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार महिला आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी पुढील महिन्यात राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. सध्या या अधिवेशनाची तारीख निश्चित झाली नाही. पण त्यासंबंधीच्या हालचालांनी मंत्रालयात चांगलाच वेग आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. महिला आरक्षण विधेयकाशी संबंधित एक घटनादुरुस्ती (131) विधेयक केंद्र सरकारने नुकतेच लोकसभेत मांडले होते. या…

Read More

शिर्डीत राष्ट्रसंत गाडगे महाराज साहित्य संमेलनात फुलला भक्तीचा मळा:प्रख्यात साहित्यिक राजेंद्र फंड यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले

प्रतिनिधी | अहिल्यानगर श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या पावन शिर्डी नगरीत २८ वे राष्ट्रसंत गाडगे महाराज मराठी साहित्य संमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. प्रख्यात साहित्यिक राजेंद्र फंड यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. साहित्याच्या या महाकुंभात राज्यभरातून आलेल्या साहित्यिकांनी शब्दांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण केली. या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आचार्य डॉ. शंकर अंदाणी होते. तर प्रमुख पाहुण्या…

Read More

‘मिशन आरंभ’ आणि ‘जी-टेस्ट’मध्ये विद्यार्थ्यांचा डंका; प्रतिकूल परिस्थितीतही मिळवले यश:मुखेकरवाडी जि.प. शाळेच्या चिमुरड्यांची स्पर्धा परीक्षेत भरारी

प्रतिनिधी | कोरडगाव ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलू लागला आहे. पाथर्डी तालुक्यातील मुखेकरवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करून खासगी शाळांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘पुरस्कार सोहळा’ गावात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संदीप मुखेकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून…

Read More