सरसकट कर्जमाफी अन् स्मार्ट मीटर हटावसाठी पारनेरात भाकपचा मोर्चा:मनरेगा व शाळा वाचवण्यासाठी आंदोलन; तहसीलदार सौंदाणे यांना दिले निवेदन
सरसकट कर्जमाफी, स्मार्ट मीटरला तीव्र विरोध, ‘मनरेगा’ कायद्याचे संरक्षण आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा वाचवण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने मंगळवारी (७ जुलै) पारनेर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. पारनेरच्या खालच्या वेशीतील ऐतिहासिक लाल चौकातून घोषणाबाजीत सुरू झालेला हा मोर्चा मुख्य बाजारपेठेतून मार्गस्थ होत तहसील कचेरीवर धडकला. तेथे मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत…