आठवडी बाजार बंद करून भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव!:अंबादास दानवेंचा आरोप, संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील पारंपरिक आठवडी बाजार बंद करण्याचा घेतलेला निर्णय सर्वसामान्यांच्या पोटावर लाथ मारणारा आहे. आठवडी बाजार बंद करून संबंधित भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज शहानुरवाडी येथे तीव्र निदर्शने केली. हा निर्णय रद्द करून गरिबांचा रोजगार वाचवावा, या मागणीसाठी ‘चला रे चला… बाजाराला चला’…