शेतकरी बांधवांनी शेती आधुनिक पद्धतीने करावी- सभापती बोंबले:पुढील वर्षांपासून 10 शेतकऱ्यांचा पंचायत समितीतर्फे गौरव
बदलत्या हवामानामुळे शेतीपुढील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यावर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जलसंधारण, पीक नियोजन, हवामानाशी सुसंगत शेतीपद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती वैशाली बोंबले यांनी केले. त्या माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती सभागृहात आयोजित कृषी दिन कार्यक्रमात बोलत होत्या. या वेळी उपसभापती संजय लघाने,…