अजित पवारांच्या तैलचित्राने भाजप-राष्ट्रवादीतील वाद मिटवण्याचा प्रयत्न:पुणे महापालिकेत स्थानिक नेत्यांची बैठक; गणेश बिडकर म्हणाले, 'आम्ही एकच'
पुणे महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय दुरावा कमी झाल्याचे चित्र मंगळवारी दिसले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तैलचित्राच्या निमित्ताने दोन्ही पक्षांमध्ये दिलजमाई झाली. गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये वाद सुरू होता. आता तो मिटवण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मंत्री चंद्रकांत…