Headlines

ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ ग्रामसेवकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा:जळगाव घटनेच्या निषेधार्थ ग्रामसेवकांचा मूक मोर्चा, कामकाजावर बहिष्कार कायम

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद आता छत्रपती संभाजीनगरमध्ये उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनने मंगळवारी (१ सप्टेंबर) जिल्हा परिषदेपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढला. अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी १८ ऑगस्टपासून ग्रामसभा कामकाजावर टाकलेला…

Read More

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?:शेतकरी हक्क परिषद, मनसेचा आरोप; तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चौकशीची मागणी

महावितरणच्या सातारा मंडल व वडूज विभागातील कामकाजात मोठ्या प्रमाणावर अनियमितता, नियमबाह्य कामे आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप शेतकरी हक्क परिषद व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी हक्क परिषदेचे अध्यक्ष अनिल सर्जेराव शिर्के व मनसेचे तालुकाप्रमुख सागर संभाजी बर्गे यांनी पत्रकार परिषदेत केली….

Read More

राहुल गांधींवरील FIR विरोधात काँग्रेस आक्रमक:नांदेडमध्ये जोरदार निषेध मोर्चा, उत्तराखंडमधील भाजप कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी

काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुलजी गांधी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या कथित द्वेषपूर्ण एफआयआरच्या निषेधार्थ नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी महात्मा ज्योतिबा फुले आय.टी.आय. चौक येथे जोरदार निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र व भाजपविरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर हा राजकीय…

Read More

डॉ. स्मीता सोनटक्के ‘जीएमसी’च्या प्रभारी डीन:कायमस्वरुपी डीनच्या नियुक्तीचा आदेश अद्याप आलेला नाही

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) प्रभारी डीनपदाची जबाबदारी ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. स्मीता सोनटक्के यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्या फॉर्म्याकोलॉजी विभागाच्या प्रमुख आहेत. डॉ. नंदकिशोर राऊत हे सोमवारी नियत वयोमानानुसार निवृत्त झाले, त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. शासनाने अद्याप नियमित डीनची नियुक्ती जाहीर केलेली नाही. त्यामुळे नवीन डीनची नियुक्ती होईपर्यंत डॉ. सोनटक्के यांच्याकडेच पदभार…

Read More

जिल्हा बँकेच्या 1132 सदस्यांना हायकोर्टाचा दिलासा:नव्याने अर्ज करण्याची मुभा, वादग्रस्त अर्जांवर जेटी निर्णय देणार

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सभासदत्व नाकारलेल्या ११३२ सदस्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा दिला आहे. न्यायालयाच्या मंगळवारच्या निर्णयानुसार, या सर्वांना येत्या दोन आठवड्यात बँकेत नव्याने अर्ज सादर करावे लागतील. दरम्यान, वादग्रस्त ठरलेल्या साधारणतः वीस ते पंचवीस सदस्यांबाबत येथील विभागीय सहनिबंधकांनी (जेटी) निर्णय द्यावा, असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांमार्फत सांगितले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमधील वादामुळे…

Read More

एक्सपायरी डेट बदलून ग्राहकांच्या जीवाशी खेळ!:नवी मुंबईत धक्कादायक रॅकेट उघडकीस, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई

राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळयुक्त आणि निकृष्ट खाद्यपदार्थांवर कठोर कारवाईचा धडाका सुरू आहे. अनेक हॉटेल्स आणि दुकानांना सील ठोकण्यात आल्याने कारवाईचा धसका अनेकांनी घेतला आहे. मात्र, असे असतानाच नवी मुंबईत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या एका अत्यंत गंभीर प्रकाराचा पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. विविध नामांकित कंपन्यांच्या खाद्यपदार्थांच्या…

Read More

ज्येष्ठ संगीत शिक्षक शशिकांत भंडारे यांचे 86 व्या वर्षी निधन:त्यांनी 60 वर्षे “नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या” माध्यमातून संगीताचे अध्यापन केले

पुण्यातील ज्येष्ठ संगीत शिक्षक, साहित्यिक आणि कीर्तनकार शशिकांत भंडारे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांनी आपल्या आयुष्यात संगीत, साहित्य आणि कीर्तन क्षेत्रात मोठे योगदान दिले. शशिकांत भंडारे यांनी पुण्यात ६० वर्षे राजेंद्र नगर आणि पर्वती परिसरात “नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या” माध्यमातून संगीताचे अध्यापन केले. ते एक उत्तम व्हायोलिनवादक आणि हार्मोनियमवादक होते. त्यांना दक्षिणात्य…

Read More

अमरावती बँकेच्या आमसभेत पीक नुकसान भरपाईचा ठराव:एकल महिलांना कर्ज, प्रोत्साहन निधी वाढीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) आमसभेत अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये शेतीपिकांच्या नुकसान भरपाईची मागणी, एकल महिलांना कर्ज उपलब्ध करून देणे आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन निधी वाढवण्याचा समावेश आहे. हे सर्व ठराव शासनाकडे पाठवून त्यांचा पाठपुरावा केला जाणार आहे. आज, मंगळवारी अमरावती येथील सांस्कृतिक भवनात बँकेची आमसभा पार पडली. संचालक…

Read More

एमआयटी-डब्ल्यूपीयूमध्ये परीक्षेवरून आंदोलन; विद्यार्थी-प्राध्यापकांत हाणामारी:विशेष परीक्षेत पुन्हा नापास झाल्याने विद्यार्थ्यांचा संताप; पोलिसांना पाचारण, गुन्हा दाखल नाही

कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये (एमआयटी-डब्ल्यूपीयू) मंगळवारी ‘इयर-डाऊन’ परीक्षेवरून विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. विशेष परीक्षेत पुन्हा नापास केल्याच्या कथित प्रकारामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये हाणामारी झाल्याचा आरोप आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बोलावण्यात आले, मात्र रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. या आंदोलनात विविध विभागांतील विद्यार्थी आणि एका राजकीय पक्षाच्या युवा…

Read More

ममता बॅनर्जींची भाची फासावर लटकलेली आढळली:शिक्षक भरती घोटाळ्यात नोकरी गेली होती, 2 वर्षांपासून नैराश्यात होती

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भाची ब्रिष्टि मुखर्जी मंगळवारी बीरभूम जिल्ह्यातील कुसुंबा गावातील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. ब्रिष्टि, ममतांच्या चुलत भावाची आणि तृणमूल नेते निहार मुखर्जी यांची मुलगी होती. प्राथमिक माहितीनुसार, तिने आत्महत्या केल्याचे मानले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रिष्टि बोलपूर उच्च प्राथमिक विद्यालयात शिक्षिका होती. शिक्षक भरती घोटाळा समोर आल्यानंतर 2024…

Read More