Headlines

पैठणला काँग्रेस पक्षाचे ‘संघटन सृजन अभियान':काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटून साजरा केला जल्लोष

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत पैठण शहर काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी ही महत्त्वाची जबाबदारी जाहीर करताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. पक्ष संघटना अधिक बळकट व गतिमान करण्याच्या उद्देशाने सध्या राज्यभर संघटन सृजन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत…

Read More

गंगापूर येथील शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी अंकुश जाधव बिनविरोध:निवड होताच पदाधिकाऱ्यांचा सत्कार पार पडला

तालुक्यातील अग्रगण्य सहकारी संस्था असलेल्या गंगापूर तालुका सहकारी शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी अंकुश जगन्नाथराव जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत व्हाईस चेअरमनपदी सौ. सुनीता कोटुवार, सचिवपदी संदीप शिरकुले, तर कोषाध्यक्षपदी मीरा गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली. शिक्षकनेते मधुकरराव वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निवडप्रसंगी ज्येष्ठ संचालक राजेश हिवाळे आणि मावळते…

Read More

Ketan Agrawal Murder Plot Twist; Siya Goyal & Chetan Chaudharis Role Revealed

पुणे2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पुणे येथील केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलिसांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर सिया गोयलने पाणी पिण्याच्या किंवा बुटाची लेस बांधण्याच्या बहाण्याने बसून चेतन चौधरीला इशारा केला. त्यानंतर, मागे चाललेल्या चेतनने केतनला दरीत ढकलून दिले. पोलिसांचे म्हणणे आहे की, केतनने खाली पडताना आपल्याला पकडू नये…

Read More

लासूर रेल्वे उड्डाणपुलाचे काम वेळेत करा:धिम्या गतीमुळे अधिकारी-ठेकेदारांवर आमदार प्रशांत बंब संतापले‎

येथील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक ३४ वरील उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाची आमदार प्रशांत बंब यांनी शुक्रवारी पाहणी केली. गेल्या सहा महिन्यांपासून कासवगतीने सुरू असलेल्या या कामावर आमदार बंब यांनी संताप व्यक्त करत, संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. लासूर रेल्वे क्रॉसिंगवरून दररोज वाहनचालकांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. असे असतानाही संबंधित यंत्रणा मात्र…

Read More

पैठणमध्ये शाळेलगत देशी-विदेशी दारूची दुकाने:शालेय विद्यार्थी, भाविकांना त्रास; मद्यविक्रीची दुकाने शहराबाहेर स्थलांतरित करण्याची मागणी‎

ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेल्या पैठण शहरातील शाळा, महाविद्यालये, मंदिरे आणि दाट लोकवस्तीच्या परिसरात सर्रास सुरू असलेल्या देशी-विदेशी मद्यविक्रीच्या दुकानांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या मद्यविक्री केंद्रांसमोर पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत उघडपणे चालणारे मद्यप्राशन, मद्यप्यांचा आरडाओरडा, वाहनांची बेशिस्त पार्किंग आणि हुल्लडबाजीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. परिणामी, परिसरातील महिला, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक तसेच दर्शनासाठी…

Read More

वैजापूरमध्ये कृषी विभागाला नियंत्रण कक्षाचाच विसर:शेतकऱ्यांना मनस्ताप, गावांतील शेतकरी राज्यस्तरीय तक्रार व्यवस्थेवर अवलंबून‎

खरीप हंगामात शेतकऱ्याला एखादी गंभीर अडचण आली किंवा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला, की त्याच्यासमोर पहिला प्रश्न उभा राहतो, आता मार्गदर्शनासाठी कोणाला फोन करायचा? वैजापूर तालुक्यात या प्रश्नाचे कोणतेही स्थानिक उत्तर मात्र कृषी विभागाकडे मिळत नाही. तब्बल १६४ गावांचा विस्तार असलेल्या या तालुक्यात कृषी विभागाची स्वतःची स्वतंत्र हेल्पलाईन किंवा नियंत्रण कक्ष नसल्याची बाब समोर आली आहे….

Read More

भरधाव कारच्या धडकेत निवृत्त वायरमनचा मृत्यू:पत्नी गंभीर, वैजापूर स्टेशन रोडवरील अपघात‎

शहरातील स्टेशन रोडवरील राजपाल क्लॉथ सेंटरसमोर रविवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत महावितरणचे निवृत्त वायरमन माधव मुरलीधर दळवी (७७) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी पुष्पलता माधव दळवी (६७) या गंभीर जखमी झाल्या. मूळचे खंडाळा (ता. वैजापूर) येथील रहिवासी माधव दळवी यांनी महावितरणमध्ये वायरमन म्हणून संपूर्ण सेवा खंडाळा परिसरात बजावली…

Read More

पैठण येथील जांभूळबनात सेवेकऱ्यांचा पर्जन्यचंडीयाग:कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम

पैठण प्रशांत महासागरातील बदलांमुळे निर्माण झालेल्या एल निनोच्या प्रादुर्भावामुळे यंदा कमी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जांभूळबनात रविवारी श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांच्या वतीने पर्जन्यचंडीयाग करण्यात आला. देशावरचे दुष्काळाचे सावट टळावे आणि बळीराजा सुखावावा, यासाठी स्वामी चरणी सुपर्जन्यासाठी साकडे घालण्यात आले. श्री स्वामी समर्थ सेवा व…

Read More

जायकवाडी धरणामध्ये 1986 नंतर मत्स्यबीज सोडण्यास मुहूर्तच मिळेना:50 हजार मच्छीमार 40 वर्षांपासून वन, मत्स्यव्यवसाय विभागात समन्वयाचा अभाव‎

जायकवाडी धरणातील मत्स्यसंपदा घटत चालली असून १९८६ नंतर धरणात एकदाही शासकीय पातळीवर नियोजनबद्ध रीतीने नवीन मत्स्यबीज सोडण्यात आलेले नाही. तब्बल ४० वर्षांपासून नव्या मत्स्यबीज संचयनाला मुहूर्त न मिळाल्यामुळे जलाशयातील गोड्या पाण्यातील अनेक पारंपरिक माशांच्या प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या प्रशासकीय अनास्थेमुळे धरणावर अवलंबून असलेल्या सुमारे ५० हजार पारंपरिक मच्छीमारांचा रोजगार संकटात सापडला आहे….

Read More

मोदी मंत्रिमंडळातून हे 6 मंत्री बाहेर पडू शकतात:श्रीकांत शिंदेंसह 9 नवीन चेहऱ्यांच्या समावेशाची चर्चा; मोठ्या फेरबदलामागची कहाणी

धर्मेंद्र प्रधान आणि हरदीप सिंग पुरी यांना मोदी मंत्रिमंडळातून वगळले जाऊ शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मंत्रालय बदलले जाण्याची आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना नवे अर्थमंत्री बनवले जाण्याची चर्चा आहे. सूत्रांनुसार, मोदी मंत्रिमंडळात हा मोठा फेरबदल पुढील काही आठवड्यांत होऊ शकतो. 1. धर्मेंद्र प्रधान, शिक्षण मंत्री हे कोण आहेत: संघ आणि विद्यार्थी परिषदेची…

Read More