Headlines

56 इंचाची छाती अन् काँग्रेसची इतकी भीती?:महिला आरक्षणावरून केवळ नौटंकी; मणिपूरवर मौन का? नाना पटोलेंचा मोदींच्या भाषणावर सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणाचा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. “५६ इंचाची छाती असल्याचा दावा करणाऱ्या पंतप्रधानांना काँग्रेसची एवढी भीती का वाटते?” असा सवाल करत, मोदींनी आपल्या भाषणात १५० पेक्षा जास्त वेळा काँग्रेसचा उल्लेख करून आपली हतबलता दाखवून दिली आहे. महिला…

Read More

अमरावती लैंगिक शोषण प्रकरण:8 पीडितांपैकी पहिली मुलगी आली समोर, नागपूरहून 250 किमी प्रवास करून नोंदवला 'SIT' समोर जबाब

अमरावती हादरवून सोडणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात अखेर एक मोठी कायदेशीर अडचण दूर झाली आहे. सामाजिक भीती आणि कलंकाची पर्वा न करता, नागपूरच्या एका १५ वर्षीय धाडसी मुलीने पुढे येत विशेष तपास पथकासमोर (SIT) आपला जबाब नोंदवला आहे. या प्रकरणात ओळख पटलेल्या ८ पीडितांपैकी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन समोर येणारी ही पहिलीच पीडिता ठरली…

Read More

नाशिक TCS प्रकरणातील पीडितेची आपबीती:म्हणाली – आरोपीने लग्नाची गोष्ट लपवली, मला रिसॉर्टवर नेऊन बळजबरीने अत्याचार केला

नाशिक येथील टीसीएस कंपनीत घडलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात आता अत्यंत खळबळजनक माहिती पुढे येत आहे. पीडितांपैकी एका तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीने आपले लग्न झाल्याची गोष्ट लपवून तिच्याशी जबरदस्थीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिच्यावर धर्मांतर करण्याचा दबाव टाकला. पीडितेने पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीत आरोपी व आपली ओळख 4 वर्षांपूर्वी झाल्याचे सांगितले आहे. महाविद्यालयात एकत्र…

Read More

सरसंघचालकपदी महिलांना संधी देणार का?:विजय वडेट्टीवार यांचा सवाल; मोदींचे भाषण आचारसंहितेचे भंग करणारे असल्याचा आरोप

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजपत महिलांना दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप केला. भाजपने जे विधेयक आणले त्यात अनुसूचित जाती, जमाती विशेषतः ओबीसी महिलांच्या आरक्षणाची कोणतीही तरतूद नव्हती. मनुस्मृती मानणाऱ्या भाजपत महिलांना नेहमी दुय्यम स्थान दिले जाते, असे ते म्हणालेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धुरा एखाद्या महिलेच्या हातात देणार का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी…

Read More

दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश-देवी शारदा विवाह सोहळा:गाणपत्य सांप्रदायाच्या परंपरेनुसार 'शारदेश मंगलम्' उत्साहात संपन्न

पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात गाणपत्य सांप्रदायाच्या परंपरेनुसार श्री गणेश आणि देवी शारदा यांचा ‘शारदेश मंगलम्’ विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी मंदिर परिसर सनई आणि मंगलाष्टकांच्या स्वरांनी निनादला होता. दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांनी भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह सोहळा थाटात पार पडला….

Read More

मुलीच्या मैत्रिणीवरच नराधम बापाकडून लैंगिक अत्याचार:पीडितेने विष प्रश्न केल्याने खळबळ, आरोपीला अटक; भंडाऱ्यात संतापाची लाट

भंडारा जिल्ह्यातील मोहदुरा गावातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली असून, एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर तिच्याच मैत्रिणीच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भीषण कृत्यामुळे मानसिक धक्क्यात असलेल्या पीडित मुलीने विषप्राशन करून टोकाचे पाऊल उचलले असून, सध्या तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी वेगाने…

Read More

अमरावतीत रोज 64 जणांना श्वानदंश:मोकाट श्वानांसाठी निवारा केंद्र अद्यापही नाही

अमरावती जिल्ह्यात मोकाट श्वानांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दररोज सरासरी ६४ नागरिकांना श्वानदंश होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महापालिकेकडून भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्र उभारणीला अद्याप गती मिळालेली नाही, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात एकूण २३,३९९ नागरिकांनी सरकारी रुग्णालयांमध्ये श्वानदंशावर उपचार घेतले आहेत. ही आकडेवारी केवळ सरकारी रुग्णालयांमधील असून, खाजगी…

Read More

खासदार वानखडेंनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी अर्ज भरला:'मी स्पर्धेत नाही', 28 एप्रिलनंतर नवे नेतृत्व जाहीर होणार

अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे यांनी जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या अर्जामुळे अध्यक्षपदाच्या निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मावळते अध्यक्ष बबलू देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. वीरेंद्र जगताप, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे हे देखील या शर्यतीत आहेत. जिल्ह्याला २८ एप्रिलनंतर नवे नेतृत्व मिळण्याची…

Read More

Congress committed infanticide of the bill in front of the country

Marathi News National Congress Committed Infanticide Of The Bill In Front Of The Country Prime Minister Modi, Said, I Will Remove The Obstacle Of Reservation… नवी दिल्ली16 तासांपूर्वी कॉपी लिंक लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक पडल्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री ८:३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. २९ मिनिटांच्या भाषणात मोदी म्हणाले-…

Read More

स्कॉलर्स प्वाईंट सचिवांचा मृतदेह माडू नदीपात्रात आढळला:आत्महत्या की इतर कारणे? पोलिस तपास सुरू

मोर्शी येथील माडू नदीपात्रात स्कॉलर्स प्वाईंट इंग्लिश स्कूलचे सचिव गजानन उद्धवराव शहाणे (वय ५५, रा. दुर्गानगर, मोर्शी) यांचा मृतदेह आढळून आला आहे. शनिवार सकाळपासून बेपत्ता असलेल्या शहाणे यांचा मृतदेह अमरावती येथील शोध व बचाव पथकाच्या जवानांनी रविवारी बाहेर काढला. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन शहाणे शनिवारी सकाळी नऊ वाजता घरातून कोणालाही न सांगता निघून गेले होते….

Read More