Headlines

शेतीला 7 तास वीज द्या, अन्यथा उपकेंद्र बंद‎:पंढरपुरात लोडशेडिंग विरोधात महावितरणवर मोर्चा; आमदारअभिजित पाटलांचा इशारा‎

संध्याकाळी ६ ते पहाटे ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्याचे आदेश असल्याचे अधिकारी सांगतात. मग उर्वरित १४ तासांमध्ये योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना किमान ७ तास नियमित वीजपुरवठा का केला जात नाही? आमची कोणतीही मागणी नियमांच्या चौकटी बाहेरची नाही. पण नियमा . या आंदोलना दरम्यान राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे अध्यक्ष नागेश फाटे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी…

Read More

शेलगावमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गाव माझा प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक उपक्रम;‎ ग्रामस्थांकडून कौतुक‎

करमाळा तालुक्यातील मौजे शेलगाव (क) येथील पायघन वस्ती शाळा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकूण ५३ विद्यार्थ्यांना गाव माझा प्रतिष्ठान यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. या साहित्यामध्ये स्कूल बॅग, वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर आदी आवश्यक शैक्षणिक वस्तूंचा समावेश…

Read More

शारीरिक आरोग्यासाठी दररोज योगाभ्यास करावा:जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांचे सोमैया विद्या मंदिर शाळेत प्रतिपादन‎

योग ही भारताने संपूर्ण विश्वाला दिलेली एक अमूल्य आणि आरोग्यदायी देणगी आहे. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अतिवापरापासून स्वतःला दूर ठेवण्याची गरज आहे. उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी मुलांनी दररोज योगाभ्यास करावा आणि मैदानी खेळांमध्ये सहभागी व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो…

Read More

माढा तालुक्यात द्राक्षबागांतील कामांना वेग:पावसाळा तोंडावर आल्याने रोगराई रोखण्यासाठी बागायतदार रात्रं- दिवस शिवारात‎

परिसरातील द्राक्षबागांमध्ये सध्या इराळणी, फवारणी, वेल बांधणी आणि बागेच्या निगेची कामे वेगाने सुरू असून द्राक्षबागायतदारांच्या कष्टाची खरी परीक्षा सुरू झाली आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने रोगराईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि बाग निरोगी ठेवण्यासाठी शेतकरी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. द्राक्षबागेतील हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात योग्य व्यवस्थापन झाले तरच पुढील हंगामात दर्जेदार…

Read More

गावाची एकी:पोलिस ठाण्याची पायरी न चढता लिंगदेव गावाने रोखला बालविवाह, कुटुंबाचे मतपरिवर्तन, मुलीच्या शिक्षणाची गावाने घेतली जबाबदारी‎

कायदा हातात न घेता, कायद्याने हात बळकट करा याचाच आदर्श वस्तूपाठ अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील ग्रामस्थांनी घालून दिला आहे. पोलिस ठाण्याची पायरी न चढता, केवळ जागरूकता, सामाजिक एकजूट आणि सकारात्मक संवादाच्या जोरावर लिंगदेवमध्ये होणारा संभाव्य बालविवा . गावकऱ्यांचा सकारात्मक आणि मुलीच्या भल्याचा हेतू लक्षात घेऊन दोन्ही कुटुंबांनी हा विवाह तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मुलीचे…

Read More

बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करा- धाडगे:श्री समर्थ माध्यमिक विद्यालयातील गुणवंतांचा केला गौरव

आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात केवळ शैक्षणिक प्रगती पुरेशी नसून विद्यार्थ्यांचे शरीर, मन, मनगट आणि मस्तक तंदुरुस्त असणे तितकेच आवश्यक आहे. अभ्यासासोबतच खेळ, कला, विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचा समतोल साधणारा विद्यार्थीच भविष्यात यशस्वी ठरू शकतो, असे प्रतिपादन पुणे येथील सहाय्यक अभियंता राजेंद्र धाडगे यांनी केले. श्री समर्थ विद्यामंदिर माध्यमिक विभागात इयत्ता दहावीच्या गुणवंत…

Read More

IMD Monsoon Rainfall Heat wave Update; Telangana MP UP Rajasthan

Marathi News National IMD Monsoon Rainfall Heat Wave Update; Telangana MP UP Rajasthan | Delhi Mumbai Bihar Jharkhand Weather Rain Alert भोपाळ/जयपूर/लखनौ/पाटणा7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक यूपी-छत्तीसगड सीमेवर अडकलेला मान्सून 23 जून रोजी पुढे सरकू शकतो. हवामान विभागाच्या मते, महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये मान्सूनला पुढे नेणाऱ्या प्रणाली सक्रिय झाल्या आहेत. मान्सून…

Read More

एमएचटी-सीईटी निकालामध्ये पारनेर पब्लिक स्कूलचा दबदबा:इंद्रनील औटी 99.91 पर्सेंटाइल गुण मिळवून जिल्ह्यात पहिला‎

महाराष्ट्र शासनातर्फे अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एम एचटी-सीईटी परीक्षेच्या निकालात ‘पारनेर पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स’ने आपला यशाचा दबदबा कायम राखला आहे. विद्यालयातील २७ विद्यार्थ्यांना ९५ पर्सेंटाइलपेक्षा जास्त गुण मिळाले. इंद्रनील औटी याने ९९.९१ परसेंटाईल गुणांसह संस्थेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. विद्यालयाच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण होत असताना लागलेला हा निकाल संस्थेच्या यशाचा…

Read More

कोल्हापुरी बंधारा फुटल्याचा फटका:बोरगाव बाजार परिसरात पाणीटंचाई, विकत घ्यावे लागते पाणी; पिके, पशुधनही संकटात‎

बोरगाव बाजार गावासह परिसरातील अनेक गावांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. गावात सुमारे १० ते १२ दिवसांनी एकदाच नळाद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे. अनेक कुटुंबांना खासगी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाण्याच्या कमतरतेचा फटका केवळ नागरिकांनाच नव्हे तर शेतकरी आणि…

Read More

मुख्यमंत्री पंचायत अभियान मूल्यांकन समितीने केली उंडणगावची पाहणी

उंडणगाव ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियान मूल्यांकन समितीने नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान समितीच्या सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात राबविण्यात आलेल्या विविध लोकाभिमुख विकासकामांची, स्वच्छता मोहिमेची आणि प्रशासकीय कामकाजाची पाहणी करून आढावा घेतला. मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना अधिक सक्षम, पारदर्शक आणि विकासाभिमुख बनविण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून…

Read More