लोणी खुर्द येथे शिव रस्ता मोकळा करण्यासाठी उपोषण:तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित
वैजापुर तालुक्यातील तलवाडा, बाभुळतेल, लोणी खुर्द येथील शिव रस्ता मोकळा करून नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, या मागणीसाठी गोकुळ मगर व शेतकरी महिलांच्या वतीने करण्यात आलेले उपोषण तहसीलदार सुनील सावंत यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून संबंधित रस्त्यावरील अतिक्रमण व अडथळ्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत होता. याबाबत प्रशासनाचे लक्ष…