पोतरा येथे विशेष ग्रामसभेवर गावकऱ्यांचा बहिष्कार:9 पैकी एकही जागा ओबीसीला आरक्षित झाली नसल्याचे कारण
कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथे ग्रामपंचायतीच्या 9 पैकी एकही जागा ओबीसीसाठी आरक्षित झाली नसल्याच्या कारणावरून गावकऱ्यांनी शुक्रवारी ता. 12 विशेष ग्रामसभेवर बहिष्कार टाकला आहे. त्यानंतर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील दाखल करणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत आज घेण्यात आली. त्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती. यावेळी मंडळ अधिकारी व्ही. एन. किन्होळकर, ग्राम महसूल…