Headlines

चिमुकल्याचे हातपाय बांधून अमानुष मारहाण!:व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घेतली गंभीर दखल, सावत्र बापावर गुन्हा दाखल

जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पैशांच्या हव्यासापोटी एका निष्पाप चिमुकल्याचे हातपाय बांधून त्याला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास येताच जालना आधीक्षकांच्या सूचनेनुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत या चिमुकल्याची सुटका केली आहे. तसेच या मुलाची वैद्यकीय तपासणी करत त्याला सुरक्षितपने…

Read More

आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगार गणेश काळेला बँकॉक विमानतळावर अटक:पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 'रेड कॉर्नर नोटीस'द्वारे केली कारवाई

दुबई आणि बँकॉक येथून भारतातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी सिंडिकेटचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार सौरभ उर्फ गणेश बाळासो काळे याला ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी करून बँकॉक विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला अधिकृतपणे अटक करून भारतात आणण्यात आले आहे. आरोपी गणेश काळेविरुद्ध पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध…

Read More

SpaceX IPO on Nasdaq | Musk Worlds First Trillionaire?

न्यूयॉर्क6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जगातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक एलॉन मस्क यांची रॉकेट कंपनी स्पेसएक्स आज, 12 जून रोजी अमेरिकन शेअर बाजार नॅसडॅकवर सूचीबद्ध होईल. गुरुवारी कंपनीने आपल्या आयपीओची अंतिम किंमत 135 डॉलर निश्चित केली आहे. 1.77 ट्रिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 168 लाख कोटी रुपयांच्या मूल्यांकनावर होणाऱ्या या लिस्टिंगनंतर एलॉन मस्क जगातील पहिले ट्रिलिनियर बनू शकतात….

Read More

पुणे महापालिका राबवणार 50 लाख वृक्षलागवड मोहीम:प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला 10 लाख, दीड कोटींची तरतूद

पुणे महापालिकेकडून यंदाच्या पावसाळ्यात शहरात 50 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी 10 लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येणार असून, एकूण दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली. महापालिकेच्या चालू अंदाजपत्रकात 50 लाख झाडे लावण्याची…

Read More

भोंदूबाबा प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या अटकेची मागणी:पुण्यात 'गुलाबो गॅंग' आणि 'बिटिया फाउंडेशन'चे आंदोलन

भोंदूबाबा अशोक खरात लैंगिक अत्याचार प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर तात्काळ अटकेची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी पुण्यात आंदोलन करण्यात आले. जंगली महाराज रोडवरील झाशीची राणी पुतळ्याजवळ शुक्रवारी ‘गुलाबो गॅंग, पुणे’ आणि ‘बिटिया फाउंडेशन, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून महिलांचे रक्षण करणे…

Read More

कर्जमाफीतील जाचक अटींवर किसान सभेचा कृषी मंत्र्यांकडे आक्षेप:देवस्थान जमीन प्रश्नी आंदोलनाचा इशारा; 12 लाख शेतकरी लाभापासून वंचित

अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य कमिटीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी पुण्यात राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. सन 2019 मधील कर्जमाफी योजनेतील जाचक अटी, नुकतीच जाहीर झालेली कर्जमाफी आणि देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा नवीन मसुदा यांवर किसान सभेने तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. मागण्यांची त्वरित…

Read More

उपमुख्यमंत्री पवार यांनी 'पुणे ग्रँड टूर' तयारीचा आढावा घेतला:स्पर्धेसाठी नियामक परिषद स्थापन करण्याचे निर्देश दिले

उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या आगामी पर्वाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्पर्धेचा दर्जा आणि व्याप्ती वाढवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. तसेच, स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नियामक परिषद स्थापन करण्याचे निर्देशही दिले. ही आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पुणे…

Read More

चर्चा विलीनीकरणाची, तयारी राजकीय महाभूकंपाची?:शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह TMCला ऑफर! काय होणार देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर परिणाम?

भारताच्या राजकारणात सध्या एका मोठ्या घडामोडीची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःचे प्रादेशिक पक्ष स्थापन करणाऱ्या नेत्यांची पुन्हा काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’ किंवा त्यांच्या पक्षांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हे खरोखरच घडले, तर देशाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणावर याचे दूरगामी परिणाम होतील. या सर्व संभाव्य राजकीय घडामोडींचा आणि इतिहासाचा घेतलेला…

Read More

देवगिरी किल्ल्यावर सारथीची स्वच्छता मोहीम:40 संशोधक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्या वतीने देवगिरी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सारथीच्या ४० संशोधक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘सारथी’ संस्थेतर्फे 26 मे ते 25 जून 2026 या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 1 ते…

Read More

गोदावरी पाटबंधारे कार्यालय नांदेडला हलवले, संभाजीनगरात महामोर्चा:राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हकालपट्टीची मागणी; हजारो नागरिक रस्त्यावर

छत्रपती संभाजीनगर येथून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता कार्यालय नांदेडला हलवल्याच्या निषेधार्थ आज, १२ जून रोजी शहरात महामोर्चा काढण्यात आला. कोणत्याही कॅबिनेट मंजुरीविना हे कार्यालय हलवण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. सेव्हन हिल उड्डाणपूल ते गोदावरी पाटबंधारे कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चामुळे जालना रोडवर मोठी वाहतूक कोंडी…

Read More