आधारकार्ड गैरवापराची भीती दाखवत १४ लाखांचा गंडा:मुंबई गुन्हे शाखेच्या नावाने सायबर चोरट्यांनी केली फसवणूक
पुण्यात सायबर चोरट्यांनी आधारकार्डच्या गैरवापराची भीती दाखवून एका संगणक अभियंता महिलेची १४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची बतावणी करत चोरट्यांनी हा गंडा घातला. नवी पेठेत राहणाऱ्या ४१ वर्षीय महिलेला चोरट्यांनी मोबाइलवर संपर्क साधला. त्यांनी महिलेला सांगितले की, तिच्या आधारकार्डचा गैरवापर करून मुंबईतील हॉटेलमध्ये खोल्या आरक्षित केल्या आहेत आणि या प्रकरणात…