दौंड नगरसेवकाच्या जात प्रमाणपत्रावरून वाद, ख्रिस्ती असल्याचा आरोप:ओबीसी नेत्यांनी तक्रार केली; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
पुणे जिल्ह्यातील दौंड नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या जात प्रमाणपत्रावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ख्रिस्ती धर्मीय असूनही त्यांनी खोट्या पुराव्यांच्या आधारे कुणबी (ओबीसी) प्रमाणपत्र मिळवल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेत्यांनी केला आहे. या प्रकरणी पुणे येथील जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. रोहित राजेश पाटील हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दौंड नगरपरिषदेवर…