मुक्ताईनगरात खडसेंचा अमृत महोत्सव:शरद पवारांनी मला अंधारातून उजेडात आणले- एकनाथ खडसे, नाथाभाऊंनी भाजप वाढवण्यासाठी मेहनत घेतली- जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा अमृत महोत्सवी सोहळा मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात एकनाथ खडसे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी राजकीय प्रवासातील जुन्या आठवणींना उजळा दिला. दरम्यान या सोहळ्यात बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, पूर्वीच्या काळात विरोधी पक्षात राजकीय मतभेद असत, परंतु वैयक्तिक द्वेष किंवा…