Headlines

नकळतपणे VSR चे विमान माझ्यासाठी बुक केले:आमची कंपनीबाबत विरोधाची भूमिका आजही कायम, पार्थ पवार यांचे स्पष्टीकरण

ज्या ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीच्या विमान अपघातात तीन महिन्यांपूर्वी अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्याच कंपनीच्या विमानातून प्रवास केल्यामुळे पार्थ पवार वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. यावर मौन सोडत पार्थ पवार यांनी हा सर्व प्रकार ‘प्रशासकीय चूक’ असल्याचे म्हटले असून, संबंधित ट्रॅव्हल एजंटवर कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे. गत २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ ‘व्हीएसआर’ कंपनीच्या…

Read More

विधीमंडळ अंदाज समिती अमरावतीत दाखल:8 सदस्य हजर., विविध विभागांचा आढावा घेतला; दोन दिवस जिल्हाभरात करणार पाहणी

शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील विधीमंडळाची अंदाज समिती मंगळवारी अमरावतीत दाखल झाली. २९ सदस्यीय समितीपैकी ८ सदस्य उपस्थित होते. समितीने विविध विभागांचा आढावा घेतला असून, बुधवारपासून जिल्हाभरात प्रत्यक्ष पाहणी दौरा करणार आहे. समितीने मंगळवारी सकाळी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यात तीन दिवसांच्या कामकाजावर शिक्कामोर्तब करण्यात आले. समितीचे सचिव विलास आठवले, सहसचिव राजेश तारवी,…

Read More

हिंगोली जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागात 53.95 लाखांचा अपहार:कनिष्ठ सहाय्यकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील कनिष्ठ सहाय्यकाने ५३.९५ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. २८ गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशीच्या हालचाली सुरु केल्या आहेत. हिंगोलील जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील कनिष्ठ सहाय्यक (लेखा) एस. सी. जावळे यांनी तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून बँकेतून रक्कम काढण्याचा प्रयत्न…

Read More

UAE ने तेल उत्पादक देशांच्या संघटनेतून ओपेक-ओपेक प्लस सोडले:इराण युद्धादरम्यान तेलाच्या बाजारात अनिश्चितता वाढली; ट्रम्प यांचा मोठा राजनैतिक विजय

संयुक्त अरब अमिरातीने (UAE) मंगळवारी (28 एप्रिल) कच्चे तेल उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांच्या ओपेक (OPEC) आणि ओपेक प्लस (OPEC+) संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद झाले असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. दीर्घकाळापासून ओपेकचा भाग असलेल्या UAE च्या या पावलामुळे सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील या गटाच्या एकतेवर…

Read More

अमरावतीत जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र सुरू:महिलांना एकाच छताखाली योजनांची माहिती व समस्या निराकरण

भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या ‘मिशन शक्ती’ मोहिमेअंतर्गत अमरावती जिल्ह्यात ‘जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र’ उघडण्यात आले आहे. महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती एकाच छताखाली मिळावी, तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे, हा या केंद्राच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे. हे केंद्र अमरावती येथील जुन्या तहसील कार्यालयात, मुख्य पोस्ट ऑफिसच्या बाजूला स्थित आहे….

Read More

वीटभट्टी मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर:मेळघाटमधील विद्यार्थ्यांचे प्रशासनाला साकडे, आंदोलनाचा इशारा

अमरावती येथील वीटभट्ट्यांवर कामासाठी येणाऱ्या मेळघाटातील मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. ‘खोज’ संस्थेचे संस्थापक ॲड. बंड्या साने, ब्रदर जोस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या मुलांसाठी वीटभट्ट्यांवरच शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे. कायद्यानुसार, मजुरांच्या मुलांसाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणीच शाळा सुरू करण्याची तरतूद आहे. मात्र, दरवर्षी या नियमाची अंमलबजावणी होत नाही. मुलांना ना तात्पुरती निवारा…

Read More

हवामानातील बदलामुळे अमरावती जिल्ह्यात मोठा निर्णय:16.85 लाख रेशनकार्डधारकांना एकाचवेळी 3 महिन्यांचे धान्य

हवामानातील बदलांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील १६.८५ लाख रेशनकार्डधारकांना एकाचवेळी तीन महिन्यांचे धान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. हा एकत्रित धान्यपुरवठा एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी असेल. लाभार्थ्यांनी त्यांच्या सोयीनुसार ३० जूनपर्यंत या धान्याची उचल करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात अंत्योदय…

Read More

भाजपकडून विधान परिषदेसाठी 5 जणांची नावे निश्चित:निष्ठावंतांना कौल; विवेक कोल्हे, प्रमोद जठार, माधवी नाईकांसह सुनील कर्जतकरांना संधी

येत्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाच्या केंद्रीय संसदीय समितीने मंजुरी दिल्यानंतर, पाच मुख्य जागांसाठी आणि एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रज्ञा सातव आणि अहिल्यानगरमधील युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नावांचा समावेश असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपने जाहीर…

Read More

आरोग्यमंत्री आबिटकर यांचे लोहगाव रुग्णालय सुरू करण्याचे आदेश:महिन्याभरात लोकार्पण; संत तुकाराम महाराजांच्या नावाची मागणी

राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाचे प्रलंबित काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. हे रुग्णालय येत्या महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज करावे, असे निर्देश त्यांनी मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालयात आयोजित बैठकीत मंगळवारी दिले आहे. या बैठकीत लोहगाव उपजिल्हा रुग्णालयासह येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी वडगावशेरी मतदारसंघाचे…

Read More

मला खुश कर, तरच सुट्टी मिळेल:वरिष्ठ अधिकाऱ्याची महिलेकडे शरीरसुखाची मागणी, जळगावच्या कंपनीतील संतापजनक प्रकार

नाशिकच्या अशोक खरात आणि आयटी कंपन्यांमधील अत्याचार प्रकरणांची शाई वाळते न वाळते, तोच जळगाव जिल्ह्यातील बांभोरी येथील ‘अॅस्टोमो’ कंपनीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. आपल्या आजारी मुलीसाठी सुट्टी मागणाऱ्या पीडितेकडे “मला खुश कर, तरच सुट्टी मिळेल,” अशी निर्लज्ज मागणी करत या नराधम अधिकाऱ्याने तिचा छळ केला. या प्रकरणी धरणगाव…

Read More