‘कांतारा’ थाटात अवतरला वराहदेव:मार्कंडेय शोभायात्रेत भूतकोला नृत्याचा थरार; एलईडी दृश्यांनी नगरकर मंत्रमुग्ध
नारळी पौर्णिमेनिमित्त श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्टच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत श्री एकदंत गणेश मित्र मंडळ आणि शिवराज्यकर्ते युवा प्रतिष्ठानने सादर केलेल्या भूतकोला नृत्याने नगरकरांचे लक्ष वेधून घेतले. ‘कांतारा’ चित्रपटातून लोकप्रिय झालेल्या कर्नाटकातील पारंपरिक लोककलेच्या धर्तीवर वराह रूपम, गुलिगा देव आणि भूतकोला नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. दहा कलाकारांच्या प्रभावी सादरीकरणामुळे मिरवणुकीला थरारक आणि अद्भुत स्वरूप…