विनोदी नाटक " ऑल दि बेस्ट' ने बार्शीकरांना खळखळून हसवले:नर्म विनोदी कथा, उत्कृष्ट अभिनयाने मने जिंकली
बार्शी नगरपालिका, भगवंत देवस्थान ट्रस्ट, बार्शी बाजार समिती, पंचायत समिती व भगवंत बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या भगवंत महोत्सवात चौथ्या दिवशी “ऑल दि बेस्ट” या मराठी विनोदी नाटकाने बार्शीकरांना खळखळून हसवले. प्रारंभी श्री भगवंताची आरती शहरातील देणगीदार डॉक्टर, व्यापारी आदींच्या हस्ते करण्यात आली. हलक्या-फुलक्या कथानकासोबत उत्कृष्ट अभिनय, नेमकेपणा यामुळे संपूर्ण कार्यक्रम रंगतदार ठरला….