Headlines

ठाणे मनपाचा तत्कालीन सहायक आयुक्त, खरातभक्त आहेरचाही महिलेवर अत्याचार:भोंदू खरातच्या नाशिक येथील कार्यालयातच केला होता अत्याचार

भोंदूबाबा अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. आता या भोंदू खरातचा भक्त असलेल्या ठाणे मनपातील तत्कालीन सहायक आयुक्तानेही महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी निवृत्त सहायक आयुक्त महेश आहेरवर ग . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आहेरने ठाणे मनपातील डाटा एंट्री ऑपरेटर महिलेला ‘तुझे भविष्य संकटात आहे’ असे म्हणून…

Read More

बोगस लाडक्या बहिणींकडून निम्मीवसुली, सरकारच्या दाजींना मात्र ‘सूट’:12,915 पैकी 6,457 बोगस लाडक्या बहिणींकडून 11 कोटी वसूल

लाडकी बहीण योजनेत श्रीमंत अन् टॅक्स भरणाऱ्या महिलांसह लाडक्या दाजींनीही योजनेचा गैरफायदा घेतला होता. लाडक्या नसलेल्या या १२,७५७ दाजींनी सरकारला २२.९६ कोटी रुपयांना चंदन लावले होते. श्रीमंत बहिणींकडून वसुलीसाठी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना पत्र पाठवून ५० टक्के वसुली केलीसुद्धा. पण घुसखोर दाजींनी लाटलेले २२.९६ कोटींच्या वसुलीसाठी महिला व बालकल्याण विभागाकडे कुठलेही नियोजन सध्या नाहीये. डिसेंबर-२०२५…

Read More

पुण्यातील IT कंपनीत विश्रांती कक्षावरून नवा वाद:विशिष्ट समाजाच्या धार्मिक विधींसाठी वापर; माधुरी मिसाळ यांचे चौकशीचे आदेश

नाशिक येथील नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या घटनेने राज्यात गदारोळ माजला असतानाच पुण्यातील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील विश्रांती कक्षाचा वापर विशिष्ट समाजाच्या धार्मिक विधींसाठी केला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकरणी चौकशी करून भेदभाव आणि नियमभंग आढळल्यास दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी…

Read More

परदेशी ऑटो-पेमेंटवर 24 तास आधी सूचना मिळेल:वापरकर्त्याला हवे असल्यास तो पेमेंट थांबवू शकेल, आरबीआयने ई-मँडेटचे नियम बदलले

आता तुम्ही नेटफ्लिक्स आणि यूट्यूब सारख्या परदेशी ॲप्सच्या सबस्क्रिप्शनसाठी ऑटोमॅटिक पेमेंट कधीही थांबवू शकाल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने परदेशी कंपन्यांना केल्या जाणाऱ्या ऑटोमॅटिक पेमेंटचे नियम बदलले आहेत. आता जर तुम्ही तुमच्या कार्ड किंवा UPI द्वारे कोणत्याही परदेशी सेवेसाठी ई-मँडेट म्हणजे दर महिन्याला पैसे कापले जाणारी प्रणाली (ई-मँडेट) सेट केली, तर तुम्हाला पेमेंटच्या 24…

Read More

अमरावती व्हिडिओ प्रकरण:अयानसह चौघांना 27 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी; महिंद्रा थार, मोबाईल, पिस्तूलचा तपास करणार

अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करून त्यांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याप्रकरणी अटकेत असलेला अयान अहमद आणि त्याच्या तीन साथीदारांची पोलीस कोठडी (PCR) २७ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. मंगळवारी त्यांना अचलपूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाबाहेर हिंदुत्ववादी संघटनांचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते निदर्शने करत होते. आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी त्यांची मागणी होती. कार्यकर्त्यांची…

Read More

अमरावती शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठी मोठी चुरस:14 जण इच्छुक, विद्यमान अध्यक्ष बबलू शेखावत यांना विरोध

अमरावती शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ इच्छुकांनी हे पद स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे विद्यमान अध्यक्ष बबलू शेखावत यांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस पक्षाने सध्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित केले असून, देशभरात ‘सृजन संघटन अभियान’ राबवले जात आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण आणि…

Read More

शिवराय कुळकर्णी चौथ्यांदा भाजपच्या प्रदेश प्रवक्तेपदी निवड:प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली घोषणा

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी शिवराय कुळकर्णी यांची चौथ्यांदा निवड झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी त्यांच्या पुनर्निवडीची घोषणा केली. कुळकर्णी यांची सलग चौथ्यांदा या पदावर निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना कुळकर्णी म्हणाले, ‘पक्षाची बाजू योग्यरीतीने मांडण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन. तसेच, भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी आणि विजयासाठी कार्यरत राहण्यासाठी…

Read More

उमरीत गोठ्याला आग; दीड लाखाचे साहित्य खाक:सीसीटीव्ही फुटेजमुळे संशयित आरोपी कैद, गुन्हा दाखल

दर्यापूर तालुक्यातील उमरी (ममदाबाद) येथे सोमवारी मध्यरात्री एका गोठ्याला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत सुमारे दीड लाख रुपयांचे शेती साहित्य जळून खाक झाले. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी रोहन विश्वास वडतकर (वय २९) आणि त्यांचे चुलत भाऊ विकास सुरेश वडतकर यांनी रहिमापूर पोलीस ठाण्यात…

Read More

शिरजगावात वीज कर्मचाऱ्याविरोधात संताप:8 दिवसांत बदली न केल्यास आंदोलनाचा इशारा, ग्रामस्थांचे सहायक अभियंतांना निवेदन

तिवसा तालुक्यातील शिरजगाव येथील महावितरणचे वीजतंत्री (लाईनमन) भूषण गाडगे यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या आठ दिवसांत त्यांची बदली न झाल्यास ‘धडक आंदोलन’ करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार, संबंधित लाईनमन अनेक दिवसांपासून मुख्यालयी राहत नाहीत. वीज बिघाड झाल्यास ते फोन उचलत नाहीत किंवा त्यांचे फोन बंद असतात. यामुळे तांत्रिक अडचणी…

Read More

बेमुदत संपामुळे नागरिकांपुढील अडचणी वाढल्या:महसूलचे 100%, आरोग्य विभागाचे 70% कर्मचारी संपावर; दाखले, रुग्णसेवा प्रभावित

अमरावती: जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांसाठी सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांनी मंगळवार, २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे महसूल विभागाचे १०० टक्के तर आरोग्य विभागाचे ७० टक्के कर्मचारी कामावर नाहीत. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी तहसील कार्यालयातून दिले जाणारे दाखले मिळू शकले नाहीत. दुसरीकडे, आरोग्य विभागातील…

Read More