Headlines

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला:वरळीतील गोंधळावरून विजय वडेट्टीवारांचा बोचरा वार, रोहित पवारांचीही टीका

वरळी येथे महायुतीच्या ‘आक्रोश मोर्चा’मुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत एका सामान्य महिलेने भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना खरीखोटी सुनावली. या प्रकरणावरून आता विरोधकांकडून भाजपवर निशाणा साधण्यात येत आहे. “भाजपच्या फोकनाड घोषणांपेक्षा सामान्य महिलेचा ‘इथून चालते व्हा’ हा एकच आवाज जास्त पॉवरफुल ठरला,” अशा बोचऱ्या शब्दांत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीकास्त्र…

Read More

पीएम व्हिजन टू आर्ट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा:युवकांमध्ये प्रचंड सृजनशीलता, नाविन्यता, कौशल्यता आणि कल्पकता – मंत्री आशिष शेलार

लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी मुंबई येथे राज्याचे संस्कृतीक कार्य मंत्री आशिष शेलार…

Read More

अमिताभ म्हणाले- परिस्थिती कशीही असो, एकट्याने लढावे लागते:म्हणाले- तुम्ही सर्वोपरी आहात आणि फक्त तुम्हीच महत्त्वाचे आहात

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ताज्या ब्लॉगमध्ये एकटेपणा आणि स्वतःच्या शक्तीला ओळखण्यावर गंभीर विचार मांडले आहेत. त्यांनी सांगितले की कठीण काळात माणसाला स्वतःच खंबीरपणे उभे राहावे लागते आणि त्याची आंतरिक शक्तीच त्याचे सर्वात मोठे शस्त्र असते. अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, जीवनात परिस्थिती कशीही असो, त्यांच्याशी लढण्यासाठी माणूस शेवटी एकटाच असतो. बिग बींच्या मते,…

Read More

बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत मोठी कारवाई:अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 32 बालविवाह रोखले, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

राज्यात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास विभागाने ‘स्पेशल फोर्स’च्या माध्यमातून मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ३२ बालविवाह रोखण्यात यश मिळवले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. बाल विवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ नुसार १८ वर्षांखालील मुलगी व २१ वर्षांखालील मुलाचा विवाह लावणे हा दंडनीय गुन्हा असून, बाल विवाह…

Read More

महायुतीच्या मोर्चामुळे वरळीत वाहतूक कोंडी:संतप्त महिलेने गिरीश महाजनांनाच झापले, मैदानात जाऊन आंदोलन करा म्हणत संताप व्यक्त

महिला आरक्षण विधेयक संमत न झाल्याच्या निषेधार्थ आज वरळीत महायुतीकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मात्र, या मोर्चात एक वेगळाच पेच पाहायला मिळाला. मोर्चामुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीत तासाभरापासून अडकलेल्या एका सामान्य महिलेचा संयम सुटला आणि तिने थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केला. “लोकांना वेठीस धरून रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा बाजूच्या मैदानात जा,” अशा…

Read More

वीजपुरवठा खंडित झाल्यास टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा:महावितरणचे ग्राहकांना आवाहन; वेळेत निराकरणासाठी ऑनलाइन पर्याय वापरा

वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा वीजबिलासंबंधी तक्रारींसाठी थेट वीज कर्मचाऱ्यांना फोन करण्याऐवजी टोल फ्री क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले आहे. 1912, 1800-233-3435 आणि 1800-212-3435 या 24 तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकांवर तक्रारी नोंदवाव्यात, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्यासाठी महावितरणची यंत्रणा 24 तास कार्यरत असते. राज्यात सुमारे तीन कोटी…

Read More

केरळममध्ये फटाका कारखान्यात स्फोट, 13 जणांचा मृत्यू:10 मृतदेह सापडले, 3 लोकांच्या शरीराचे अवयव विखुरलेले आढळले; 40 मजूर काम करत होते

केरळममधील त्रिशूर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी 3.30 वाजता फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. या दुर्घटनेत 13 लोकांचा मृत्यू झाला. कारखान्यातील अनेक लोक भाजले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, घटनास्थळावरून 10 मृतदेह सापडले, तर 3 लोकांच्या शरीराचे अवयव सापडले. दुर्घटनेच्या वेळी शेडमध्ये सुमारे 40 लोक उपस्थित होते. अग्निशमन दल, पोलिस आणि…

Read More

विश्रामबाग वाडा प्रभाग समिती अध्यक्षपदी बाप्पू मानकर बिनविरोध:अध्यक्षपदाची गाडी नाकारून वाचलेला निधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा निर्णय

भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांची विश्रामबाग वाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर त्यांनी अध्यक्षपदासाठी मिळणारी शासकीय गाडी नाकारत, त्यातून वाचणारा निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्याची विनंती प्रशासनाला केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मंगळवारी पुणे महानगरपालिकेच्या १५ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या…

Read More

आराध्याला सरप्राइज देण्यासाठी विमानतळावर पोहोचली ऐश्वर्या राय:मुलीच्या मित्रांसोबत व्हिडिओ आणि फोटो घेताना दिसली अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात त्या आपली मुलगी आराध्या बच्चनला घेण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचली. आराध्या तिच्या स्कूल ट्रिपवरून परतली होती आणि ऐश्वर्याने विमानतळावर पोहोचून तिला सरप्राइज दिले. व्हिडिओमध्ये दिसते की, आराध्या विमानतळाबाहेर येताच ऐश्वर्या तिला पाहून खूप आनंदी झाली. तिने लगेच आपला फोन काढला आणि आपल्या मुलीचे फोटो आणि…

Read More

'पोलीस भरती' झाल्याचे सांगून तरुणाने वाटले पेढे:नऱ्हे येथे फसवणूक करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

पुणे, प्रतिनिधी: नऱ्हे येथील एका तरुणाने आपण पोलीस दलात भरती झाल्याचे खोटे सांगून सोसायटीत पेढे वाटले आणि चौकात अभिनंदनाचे फलक लावले. नऱ्हे पोलीस ठाण्यातील कर्मचारी त्याचे अभिनंदन करण्यासाठी गेले असता, हा प्रकार उघडकीस आला. समाजात प्रभाव पाडण्यासाठी तरुणाने ही बतावणी केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ऋषीकेश राजू जाधव (वय २६, रा….

Read More