अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांना आता मराठीशिकण्यासाठी एक वर्ष मुदतवाढ- फडणवीस:उत्तर प्रदेश निवडणुका,बिहारच्या राजकारणामुळे फडणवीसांचे ‘डॅमेज कंट्रोल’
अमराठी रिक्षा, टॅक्सीचालकांना दैनंदिन संवादापुरती जुजबी मराठी शिकण्यासाठी राज्य सरकारने आता १ वर्षाची मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत भाषेच्या कारणावरून चालकांवर कोणतीही दंडात्मक अथवा कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. महायुती समर्थक हाजी अराफत यांच्या नेतृत्वाखालील चालक संघटनांच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर हा दिलासा देण्यात आला. प्रमाणपत्र वाटपात भोजपुरी गाण्यांमुळे…